Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

के.डी. गावित सैनिकी विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात टीचर्स ओरिएंटेशन प्रोग्रॅम उत्साहात

team by team
June 26, 2025
in शैक्षणिक
0
के.डी. गावित सैनिकी विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयात टीचर्स ओरिएंटेशन प्रोग्रॅम उत्साहात

नंदुरबार l प्रतिनिधी

के.डी. गावित सैनिकी विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय पथराई ता. नंदुरबार येथे टीचर्स ओरिएंटेशन किंवा वर्कशॉप प्रोग्रॅम संपन्न झाला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटी नटावदचे अध्यक्ष राजेंद्रकुमार गावित, सचिव डॉ. विभूती गावित, सचिव आ. ऋषिका गावित यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी सैनिकी विद्यालयातील प्राचार्य शरद बागुल, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. दोन दिवशीय कार्यशाळेत पहिल्या दिवशी आहे. चार तासिका व दुसऱ्या दिवशी चार तासिका घेण्यात आल्या. या चारही तासिकांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार राबविण्यात आलेल्या वेगवेगळ्या विषयांवरती सुलभन करण्यात आले. कार्यशाळेसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार शालेय संस्कृती, शिक्षक व विकसन व सबलीकरण, भारतीय ज्ञानप्रणाली, शिक्षणाचे ऑनलाईन स्रोत, मूल्यांची रुजवणूक, सामाजिक व भावनिक बुद्धिमत्ता, अध्यापन शास्त्रीय दृष्टिकोन, एकविसाव्या शतकातील आव्हाने व कौशल्य आणि ताण तणावाचे व्यवस्थापन अशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चात्मकरीत्या मार्गदर्शन व सुलभन करण्यात आले.

यासाठी शाळेतीलच शिक्षक श्रीमती रजनी करेल, महेंद्र बांगर, प्राचार्य शरद बागुल, विकास पाटील, संदीप इशी. इकबाल शहा. प्रा. विजय काळे व प्रा. ज्ञानेश्वर गवळे यांनी या संपूर्ण कार्यशाळेतील विषयांचे सुलभन केले.

सदर कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी राजेंद्रकुमार गावित तसेच सचिव डॉ. विभूती गावित, सचिव ऋषिका गावित यांनी शिक्षकांना मार्गदर्शन केले व या कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक प्राचार्य शरद बागुल यांनी केले. त्यात त्यांनी सांगितले की टीचर एम्पॉवरमेंट फोरम अंतर्गत हा टीचर्स ओरिएंटेशन प्रोग्राम आयोजित केला असून नुकत्याच भारतात लागू झालेल्या नवीन शैक्षणिक धोरण, ज्याला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० असे म्हटले जाते, त्या अनुषंगाने हा संपूर्ण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. ज्ञानेश्वर गवळे यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन महेंद्र बांगर, श्रीमती रजनी करेले, प्रा. विजय काळे, प्रा. ज्ञानेश्वर गवळे यांनी केले.

बातमी शेअर करा
Previous Post

आणीबाणीत कारावास झालेल्या बंदिवानांचा जिल्हा प्रशासनाकडून गौरव

Next Post

डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धा, युवक युवती तसेच विद्यार्थ्यांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

के.डी. गावित सैनिकी विद्यालयात सामूहिक रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

नांदरखे येथे रक्षाबंधन उत्साहात साजरा

August 30, 2026
राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

राखी बांधून वृक्षसंवर्धनाचा संदेश; शिवदर्शन विद्यालयात रक्षाबंधन उत्साहात

August 30, 2026
मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

मतदानापासून कोणीही वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे डॉ.विजयकुमार गावित यांचे आवाहन

August 30, 2026
माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

माजी मंत्री आ. डॉ. विजयकुमार गावित यांना राखी बांधत लाडक्या बहिणींनी दीर्घायुष्य चिंतले

August 30, 2026
शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

शहादा येथे तृतीयपंथियांसाठी जाणिव जागृती कार्यशाळा

August 26, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add