नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार तालुका विधायक समिती संचलित श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालय भादवड तालुका जिल्हा नंदुरबार येथे दिनांक 21 जून 2025 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा करण्यात आला.
विद्यालयाच्या पटांगणावर विद्यालयाचे मुख्याध्यापक ए.बी. पाटील, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी विद्यालयाचे क्रीडा शिक्षक बी एम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष योग साधना करून योग दिनाचा आनंद घेतला.
विविध योग आसनांचा व प्राणायामांचा प्रत्यक्ष सराव करून योगाद्वारे आपले शरीर व मन कसे प्रसन्न होते याचा अनुभव घेतला. विद्यार्थ्यांना योग दिवस साजरा करण्यामागचा हेतू उद्देश विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक टी.जी. पाटील यांनी सांगितला. आपले शरीर व मन सुदृढ राहण्यासाठी दररोज आपण किमान आपल्या शरीरासाठी एक तास योग साधना व प्राणायाम यांना देण्याचा आजच्या दिनी संकल्प करण्यात आला.