नंदुरबार l प्रतिनिधी
के.डी. गावित सैनिकी विद्यालय व कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय पथराई तसेच दामजी पोसला गावित आयुर्वेद महाविद्यालय पथराई ता. नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने के.डी. गावित शैक्षणिक संकुल पथराई या ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेच्या संचालिका आ .सौ. इलाताई गावित, सचिव डॉ. विभूती गावित, सचिव ऋषिका गावित, संस्थेचे कार्यालयीन अधीक्षक सि.टी. गोसावी, आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य व्यास, फार्मसी विभागाचे प्राचार्य एकनाथ पाटील, सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य शरद बागुल उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते सर्वप्रथम दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यानंतर संस्थेचे माजी कार्यालयीन अधीक्षक वसंत पाटील यांनी योग साधनेसाठी सर्व सूचना व मार्गदर्शन केले आणि त्यांच्या मार्गदर्शनाने संकुलातील उपस्थित सर्व विद्या शाखांचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी योग साधना केली. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेच्या संचालिका इलाताई गावित यांनी मार्गदर्शन केले त्या म्हणाल्या की, सर्वत्र सुखीना संतु,सर्वे संतु निरामया या आयुर्वेदातील उक्ती प्रमाणे प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनामध्ये योगसाधना व व्यायामाला महत्त्व दिले पाहिजे याविषयीचे मार्गदर्शन केले.
त्यानंतर सचिव डॉ. विभूती गावित यांनी देखील विद्यार्थ्यांना योगसाधना ही किती महत्त्वाची असते व त्यामुळे विद्यार्थ्यांना किती फायदे होतात हे पटवून दिले. व शेवटी सचिव ऋषिका गावित यांनी देखील विद्यार्थ्यांना व सर्व उपस्थितना योग साधने विषयीचे महत्त्व विशद केले आणि सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा देखील दिल्या.याप्रसंगी के. डी. गावित शैक्षणिक संकुलातील सर्व विद्या शाखा व त्यांचे प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.