नंदुरबार l प्रतिनिधी-
राज्यातील दुसऱ्या क्रमांकावरील थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ येथे कोकणच्या धर्तीवर होम स्टे प्रकल्प राबविण्यात येत आहे. तसेच पर्यटनस्थळी प्रसिद्ध सीताखाईजवळील झीप लाइनचे काम पूर्ण झाले असून चाचणी यशस्वी झाली आहे आवश्यक त्या प्रक्रिया पूर्ण करून वन विभागाकडे ती सोपविली जाणार आहे. पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक विकास व रोजगाराला चालना मिळणार असून स्थलांतर थांबवण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे.
नंदुरबार जिल्हात सातपुड्यातील दुर्गम भागात वसलेले तोरणमाळ राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण आहे. मात्र अनेक वर्षांपासून तोरणमाळ पर्यटन स्थळ दुर्लक्षितच राहिले. तोरणमाळ येथे कोकणच्या धर्तीवर होमस्टे प्रकल्प राबवण्यात येत आहे. यामुळे येथील अनेक नागरिकांना थेट रोजगार उपलब्ध होणार आहे. सातपुड्यात मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या शोधासाठी स्थलांतर होत असते.
स्थलांतर थांबवण्यासाठी होमस्टे प्रकल्प राबवण्यात येत आहे. या प्रकल्पाची नुकतीच जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी पाहणी केली.तोरणमाळ येथील चार होमस्टे युनिट्सची पाहणी करीत गुणवत्तेतील त्रुटींवर नाराजी व्यक्त करून कंपनीला दुरुस्तीचे स्पष्ट आदेश देण्यात आले. कामात सुधारणा केल्याशिवाय कोणतेही देयक अदा केले जाणार नाही हे देखील स्पष्ट करण्यात आले.
*झीप लाइनची यशस्वी चाचणी*
हिमाचल प्रदेशात कुणा मनाली तसेच इतर पर्यटन स्थळावर जीप लाईन पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. पर्यटन स्थळ असलेल्या तोरणमाळ येथील प्रसिद्ध असे सीताखाई ते इको पॉइंट पर्यंत झिप लाईन उभारण्याचे काम वर्षभरापासून सुरू होते.
पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी तसेच त्यातून स्थानिकांना रोजगार निर्माण होणार आहे. नुकतीच झिप लाईनची यशस्वी चाचणी घेण्यात आली. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून वन विभागातील सुपूर्त करण्यात येणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असलेल्या दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण तोरणमाला विविध प्रकल्पातून
संजीवनी मिळण्याची चिन्हे आहेत.