नंदुरबार l प्रतिनिधी
तळोदा तालुक्यातील तलावडी शिवारातील शेतात शेतजमीन खेडत असतांना ट्रॅक्टरच्या धडकेत १० वर्षीय बालक ठार झाल्याची घटना घडली . याप्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , तळोदा शहरातील प्रधानहट्टी येथील योगेश रघुनाथ पाडवी हे तलावडी गावाच्या शिवारातील महाजन यांचे शेतात ट्रॅक्टर ( क्र.एम.एच .३ ९ एबी ७८०२ ) रोटरसह शेतजमीन खेडत होते . यावेळी शेतजमीन खेडत असतांना निष्काळजीपणे ट्रॅक्टर चालवून दिनेश प्रभू पाडवी ( वय १० ) रा . तलावडी ता . तळोदा या बालकास धडक दिली . यात गंभीर दुखापत झाल्याने दिनेश पाडवी ठार झाला . याबाबत सुमनबाई प्रभू पाडवी यांच्या फिर्यादीवरुन तळोदा पोलिस ठाण्यात योगेश पाडवी याच्याविरोधात भादंवि कलम ३०४ ( अ ) , २७ ९ , ३३८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास पोहेकॉ . भील करीत आहेत .








