नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुका विधायक समितीचे एस. आर.सी .इंदानी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, कोपर्ली विद्यालयाचा इ.१० वी निकाल ९६.१५ टक्के लागला.
एस.आर.सी.इंदानी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोपर्लीचा इयत्ता दहावी मार्च २०२५ चा निकाल ९६.१५ टक्के लागला असून प्रथम क्रमांक अर्चना रूपसिंग राऊळ
९१.६० टक्के,द्वितीय क्रमांक सोनल कैलास पाटील ८८.२० टक्के,तृतीय क्रमांक प्रेमसिंग दिनेश राऊळ ८७.२० टक्के मिळून यशस्वी झाले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे चेअरमन चंद्रकांत रघुवंशी, व्हा.चेअरमन मनोज रघुवंशी,सचिव यशवंत पाटील,कार्यालयीन अधिक्षक पुष्पेंद्र रघुवंशी, प्राचार्य एस .एन.पाटील, पर्यवेक्षक व्ही .के .पाटील,प्राध्यापक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या.