नंदुरबार l प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाने राज्यपाल यांच्या मंजुरीसाठी पाठवलेले विधेयक क्र.३३ विशेष जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात नंदुरबार जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षाच्यावतीने द्या दि.१५ मे २०२५ रोजी जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या संदर्भात जिल्ह्यातील सर्व दलित, आदिवासी, मुस्लिम संघटनेतर्फे जिल्हाभरात या विधेयकाविरोधात जनजागृती केली जात होती. यासाठी अनेक बैठका झाल्यात व जिल्ह्यात या जनविरोधी, लोकशाहीविरोधी तसेच संविधान विरोधी एकूण वातावरण झाले आहे.
परंतू याबाबतीत पोलीस प्रशासनाला या मोर्चाच्या परवानगीसाठी जनसुरक्षा विधेयक विरोधी लोकशाही मंचच्यावतीने पाच दिवसापूर्वी निवेदन देत मोर्चासाठी परवागनी मिळणेकामी सर्व संघटनांच्या शिषठमंडळाने रितसर निवेदन दिले होते. परंतू जिल्ह्यात मनाई आदेशाचे कारण देत पोलीस प्रशासनाने या मोर्चाला कालमर्यादेत परवानगी दिली नाही. त्यामुळे आज दि.१४ मे २०२५ रोजी या जनसंघटना पक्षाच्यावतीने काही संघटनांच्या प्रतिनिधींशी बैठक होवून सर्वानुमते जनआक्रोश मोर्चा तुर्त स्थगित करण्याचे ठरविण्यात आले आहे.
सदर स्थगित झालेच्या मोर्चाची बैठक घेवून पुढील तारीख जाहीर करण्यात येणार आहे. बैठकीस कॉ.नथ्थु साळवे, वाहरुभाऊ सोनवणे, प्रतिभा शिंदे, एजाज बागवान, बाळासाहेब ब्राम्हणे, अरुण रामराजे, जितेंद्र तायडे, भिमराव अहिरे, रसिकलाल पेंढारकर, विक्रम गावीत, दादाभाई पिंगळे दादाभाई पिंगळे, वासुदेव गांगुर्डे, नासिर मन्यार, श्रीकांत पवार, करणसिंग कोकणी, प्रदीप मोरे, भिलाभाऊ भिल, सुनिल गायकवाड, आप्पा वाघ, विक्रम गावीत, करणसिंग कोकणी, अनिल ठाकरे, ऍड.मजहर शेख, नानासाहेब ठाकरे आदी उपस्थित होते.