नंदुरबार l प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने आयोजित मंगल कलश यात्रेचे येत्या 28 एप्रिल 2025 रोजी सारंगखेडा गावात आगमन होणार आहे. ही यात्रा जिल्हयात सारंगखेडा व्हाया शहादा,प्रकाशा, नंदुरबार ते न्याहली अशा मार्गाने मार्गस्थ़ होणार आहे. त्या संदर्भात चर्चा व नियोजन करण्यासाठी नंदुरबार शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांच्या अध्यक्षतेखाली मदर टेरेसा हायस्कूलच्या सभागृहात पार पडली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष मोंटू जैन,जिल्हा सरचिटणिस मधुकर पाटील,नंदुरबार तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा वैशाली मनोज चौधरी, ज्येष्ठ़ पदाधिकारी जगदीश जायस्वाल,ॲड. प्रकाश भोई,अनिल चौधरी, अजहर मिया जहांगिरदार, मुजाईद सैय्यद, इमरान काकर,अदनान मेमन, सुनिता शिंपी, प्रतिभा कुळकर्णी, युनुसभाई करणखेडा,,धनराज बच्छाव, राजा ठाकरे,सागर पाटील, सतिष मंगळे, अनिल पगारे,राजु पवार, मोहन ढोणे,रमेश सोनवणे, सिकंदर कुरेशी आदी मान्य़वर उपस्थित होते.
28 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजेला सारंगखेडा येथे मंगल कलश यात्रेचे आगमन होणार असून त्यानंतर शहादा,प्रकाशे,लहान शहादा, नंदुरबार शहरातील करण चौफुली,जिजामाता महाविद्यालय, अवलगाझी जवळ तसेच पुढील खेडयांवर ठिकठिकाणी स्वागत करण्यात येणार आहे.
प्रत्येक स्वागत स्थळी फटाक्यांची आतषबाजी तसेच थंड पेयची सुविधा करण्यात येणार आहे.नंदुरबार जिल्हयातील शेवटचे गाव न्याहली येथे मंगल कलश यात्रेला पुढील यात्रेसाठी शुभेच्छा देण्यात येणार आहेत.ही यात्रा धुळयाकडे रवाना होणार आहे.या 80 किमी च्या यात्रेसंदर्भात डॉ.अभिजीत मोरे यांनी सुक्ष्म नियोजनासंदर्भात पदाधिकाऱ्याना मार्गदर्शन केले.तसेच विविध पदाधिकाऱ्यांनी काही शंका उपस्थित केल्या.त्याचे निरसरण करण्यात आले.