नंदुरबार l प्रतिनिधी
दि.16 एप्रिल 2025 रोजी म्हसावद पोलीस ठाणे हद्दीतील नवागाव ते चिचोरा गावाकडे जाणा-या रोडवर पुलाजवळ एक अनोळखी इसमाचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती मिळाली. सदर माहितीचे आधारे म्हसावद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश वारुळे हे लागलीच स्टाफसह घटनास्थळी रवाना झाले. सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता मयत हा फत्तेपुर गावातील असुन त्याचे नाव शिक्षण राश्या पवार, वय- 63 वर्षे, रा.फत्तेपुर ता. शहादा, जि. नंदुरबार असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर सदर घटनास्थळावर पोलीसांनी गावातील लोकांना विचारपूस केली परंतु सदर ठिकाणाहून काहीएक उपयुक्त माहिती मिळून आली नाही. त्यावरुन म्हसावद पोलीस ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 103 (1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांनी म्हसावद पोलीस ठाण्याचे प्रभारी गणेश वारुळे यांना एक तपास पथक तयार करण्याच्या सुचना दिल्या. दिलेल्या सुचनांप्रमाणे सहा. पोलीस निरीक्षक श्री. वारुळे यांचे नेतृत्वात तपास पथकाने घटनास्थळाचे आजुबाजुचे परिसरात व खेडेगावात जावुन गुन्हयातील अज्ञात आरोपींचा शोध घेत होते, त्यादरम्यान पोलीस पथकास गोपनीय माहिती मिळाली की, नवागाव येथील राहणारा जयेंद्र शेवाळे हा गुन्हयात सहभागी असल्याची खात्रिशीर माहिती मिळाली, त्यावरुन इसम जयेंद्र शेवाळे याचा नवागाव येथे त्याचे राहते घरी शोध घेतला असता तो त्याचे शेतात गेला असल्याची माहिती मिळाली. पोलीस पथकाने लागलीच शेतात जाऊन जयेंद्र शेवाळे याचा शोध घेत असतांना
तो पळून जाण्याचा प्रयत्न करुन लागला त्यास पोलीस पथकाने शिताफिने ताब्यात घेतले व त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव जयेंद्र कपसिंग शेवाळे रा. नवागाव, ता. शहादा जि. नंदुरबार असे कळविले. सदर गुन्हयाबाबत त्यास विश्वासात घेऊन विचारपुस करता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली.
तसेच गुन्हयात त्याचा मामा मधुकर ठाकरे, रा. आकाशपुर, ता. शहादा हा देखील सहभागी असल्याचे त्याने सांगितले. त्यावरुन पोलीस पथकाने लागलीच आकाशपुर येथे रवाना होऊन मधुकर ठाकरे याचा शोध घेतला असता तो देखील मिळून आला. त्यास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव मधुकर सालमसिंग ठाकरे रा. आकाशपुर ता. शहादा जि. नंदुरबार असे कळविले. त्यास गुन्हयाबाबत विचारपुस करता त्याने देखील गुन्हयाची कबुली दिली असुन सदर गुन्हा हा वैयक्तिक वादातुन झाला असल्याची प्राथमिक माहिती दिली आहे. गुन्हयाचा पुढील अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक गणेश वारुळे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस. अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उपविभागीय पोलीस अधिकारी, शहादा दत्ता पवार यांचे मार्गदर्शनाखाली म्हसावद पोलीस ठाण्याचे प्रभारी गणेश वारुळे, पोउपनि जितेंद्र पाटील, पोउपनि गुलाबसिंग पावरा, पोहेकों जितेंद्र पाडवी, अजित गावीत, निलेश पाटील, पोकों वसंत वसावे, मुकेश पवार, राकेश पावरा, रविंद्र पवार अशांनी केली आहे.