नंदुरबार l प्रतिनिधी
जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथील पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेध व्यक्त करण्यासाठी शिवसेनेकडून मूक मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
काश्मीर खोऱ्यातील पहलगाममध्ये अतिरेक्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळ्या झाडून हल्ला केला. यात 26 निष्पाप पर्यटक मृत्युमुखी तर अनेक जखमी झाले आहेत. या घटनेच्या सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात येत असून,संतापाची लाट उसळलेली आहे. शिवसेनेने या घटनेच्या निषेध व्यक्त केला आहे.
शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड.राम रघुवंशी यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीने शहरातून निषेध मोर्चा काढण्यात आला. सायंकाळी ६ वाजता आमदार कार्यालयापासून निषेध मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर मोर्चा जुने नगरपालिका चौक,स्टेशन रोड,नेहरू पुतळा, स्वामी समर्थ केंद्र परिसर,हाटदरवाजा मार्गे अहिल्यादेवी विहीर व तेथून शहीद शिरीषकुमार स्मारकापर्यंत नेण्यात आला.शहीद शिरीषकुमार स्मारकाजवळ मूक मोर्चा आल्यानंतर त्या ठिकाणी शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांनी मेणबत्ती प्रज्वलित करून मृतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर शिवसेनेचे पदाधिकारी, विविध स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी व नागरिकांनी सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली.
यावेळी शिवसेना महिला जिल्हाप्रमुख ज्योती राजपूत,माजी नगरसेवक किरण रघुवंशी,माजी नगरसेवक यशवर्धन रघुवंशी,उद्योगपती,देवेंद्र जैन शिवसेना विधानसभा अध्यक्ष कुणाल वसावे, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष परवेज खान,माजी नगरसेवक विलास रघुवंशी,शत्रु बालानी, निझर बाजार समिती सभापती योगेश राजपूत,
शिवसेना शहर प्रमुख रवींद्र पवार,माजी नगरसेवक दीपक दिघे,ज्येष्ठ शिवसैनिक गजेंद्र शिंपी, महानगरप्रमुख विजय माळी, युवा सेना तालुका प्रमुख राजेश वसावे,युवती सेना जिल्हाध्यक्ष राजश्री मराठे, माजी नगरसेवक फरीद मिस्तरी,निंबा माळी,जगन माळी,फारुख मेमन, मोहितसिंग राजपूत, युवा सेना शहरप्रमुख बंटी सूळ उपस्थित होते.
अतिरेक्यांच्या हल्ल्याच्या निषेध करण्यासाठी मूक मोर्चात सहभागी झालेल्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या हाताच्या दंडावर काळीपट्टी बांधण्यात आली होती.काय दोष होता त्यांच्या ? असा संतप्त सवाल उपस्थित करून अतिरेकी भ्याड हल्ल्याच्या निषेध करण्यात आला.