Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

राज्यातील २४ जिल्हे व १०३ तालुके अवकाळी पावसाने बाधित;शेतकऱ्यांना हमखास मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील: कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

team by team
April 7, 2025
in राजकीय
0
राज्यातील २४ जिल्हे व १०३ तालुके अवकाळी पावसाने बाधित;शेतकऱ्यांना  हमखास मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील: कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

नंदुरबार । प्रतिनिधी

गेल्या चार ते पाच दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पाऊस झाला आहे. आत्तापर्यंत राज्यातील २४ जिल्हे १०३ तालुके या अवकाळी पाऊस, अतिवृष्टी आणि गारपिटीने बाधित झाले आहेत. मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे, त्यात कांदा पिकाचे हजारो एकरावर नुकसान झाले आहे; त्यामुळे शेतकरी बांधवांना जास्तित जास्त हमखास मदत मिळण्याच्या दृष्टीने शासन प्रयत्नशील असल्याचे राज्याचे कृषिमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी सांगितले आहे.

ते आज नंदुरबार जिल्ह्यातील ठाणेपाडा येथील अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची पाहणी करताना बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सी.के.ठाकरे तहसीलदार मिलिंद कुलथे यांच्यासह महसूल व कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी व गावकरी उपस्थित होते.

यावेळी शेतकऱ्यांना दिलासा देताना कृषिमंत्री तथा पालकमंत्री ॲड. कोकाटे म्हणाले, सर्व नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकाऱ्यांना दिले आहेत. बहुतांश ठिकाणचे पंचनामे झाले आहेत काही ठिकाणी एक दोन दिवसांत पंचनाम्यांचे काम पूर्ण होईल. येत्या आठ दिवसांत अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या परिस्थितीतचा संपूर्ण राज्याचा आराखडा आपल्या समोर येईल. हा आराखडा मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर मंत्रीमंडळासमोर सादर करून शेतकऱ्यांना निश्चितपणे जास्तित जास्त मदत करण्याबाबत निर्णय घेतला जाईल.

ते पुढे बोलताना म्हणाले, नंदुरबार जिल्ह्यातील ठाणेपाडा, गंगापूर आंबापूर अशा तीन गावांमध्ये वादळ, गारपिट आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चव्हाण हे आज (७ एप्रिल २०२५) नंदुरबार दौऱ्यावर येत आहेत, त्यांच्याशी या परिस्थितीवर चर्चा करून केंद्र सरकारकडेही मदत मागणीसाठी प्रस्ताव पाठवणार असल्याचे सांगून ते पुढे म्हणाले, कुठल्याही परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे हे शासनाचे धोरण आहे, त्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी थेट शेतकरी बांधवांशी संवाद साधून कृषिमंत्री तथा पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी त्यांना शासनाकडून दिलासा देण्याबाबात आश्वस्त केले.

बातमी शेअर करा
Previous Post

देहविक्री व्यवसाय सुरू असलेल्या बंगल्यावर स्थानिक गुन्हे शाखेची रेड, ग्राहक तसेच बंगला मालकासह 11 जणांना अटक

Next Post

नंदुरबारला मिळणार नव्या 108 रुग्णवाहिका आणि वैद्यकीय अधिकारी : पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

Next Post
नंदुरबारला मिळणार नव्या 108 रुग्णवाहिका आणि वैद्यकीय अधिकारी : पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

नंदुरबारला मिळणार नव्या 108 रुग्णवाहिका आणि वैद्यकीय अधिकारी : पालकमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

June 28, 2026
३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

३२ दुचाकी चोरीचा पर्दाफाश; तीन सराईत जेरबंद, तब्बल ३०लाखांचा मुद्देमाल जप्त

June 28, 2026
मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई;  गुन्हा दाखल

मोलगीतील स्टंटबाजावर पोलिसांची कारवाई; गुन्हा दाखल

June 28, 2026
नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

नवापूर पोलिसांची कारवाई; ३५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू व कंटेनर जप्त

June 28, 2026
कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

कोपर्ली इंदाणी विद्यालयात जागतिक योग दिन उत्साहात साजरा

June 24, 2026
आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

आंतरराज्यीय टोळी जेरबंद, १५ गुन्हे उघड

June 24, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add