नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार ते निजर रस्त्यादरम्यान असलेल्या लाल त्रिकोणी बंगल्यामध्ये देहविक्री व्यवसाय सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकत बंगला मालकाचा 11 जणांना अटक केली आहे.
उपनगर पोलीस ठाणे हद्दीतील नंदुरबार ते निझर रोड दरम्यान असणा-या लाल/त्रिकोणी बंगल्यामध्ये देहविक्री व्यवसाय सुरू असल्याची गोपनिय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. त्याअन्वये जिल्हा पोलीस अधीक्षक, श्रवण दत्त. एस यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा.पोलीस निरीक्षक हेमंत पाटील व उपनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव यांचेसह स्टाफ अशांनी नंदुरबार निझर रोडवरील कल्याणी रेसिडेन्सीचे पुढे काही अंतरावर असलेल्या लाल/त्रिकोणी बंगल्याजवळ गेले असता तेथे बंगला क्रमांक 2 मध्ये काही संशयित हालचाली दिसल्याने तेथे रात्रीचे सुमारास छापा टाकला असता,
सदर ठिकाणी स्वमालकीचे बंगल्यात देहविक्री व्यवसाय चालविणारे मालक चालक संजय ब्रिजलाल चौधरी रा. प्लॉट नं. 43, जय समाधी नगर, नंदुरबार यांच्यासह ग्राहक धर्मेश वसंतभाई वसावा, रा.उमरपाडा देवरुपम जि. सुरत,विपूल जयंतीभाई वसावा रा. सागबारा, जि.नर्मदा गुजरात, हर्षेद कांतीलाल पाटील रा.लोणखेडा, ता. शहादा, जि. नंदुरबार,अशोक सुदाम पाटील रा.लोणखेडा, ता. शहादा, जि. नंदुरबार,अनमोल कुवरसिंग वसावा, रा.सागबारा, ता. नलगाव, जि. नर्मदा, गुजरात, राहुल केशव गामित रा. सिंगपुर, ता. सोनगड, जि. तापी, गुजरात, आशिष हिरालाल वसावा, रा.मोठी देवरुपण ता. उमरपाडा, जि. सुरत, हर्षेद विश्वनाथ गावित रा. वडगाव, ता.उमरपाडा, जि. सुरत, नितेश धिरसिंग वसावा रा. वडगाव, ता.उमरपाडा, जि. सुरत, अर्जुन दिनेश वसावा रा. वडगाव, ता.उमरपाडा, जि. सुरत असे मिळुन आले. सदर ठिकाणी एकुण 4 पिडीत महिला मिळुन आल्या आहेत. त्याचप्रमाणे सदर ठिकाणाहून 5,650/- रुपये किमतीचा दारु, गुटखा व इत्यादी मुद्देमाल देखील जप्त करण्यात आला आहे.
तरी नमुद निझर रोडवरील लाल/त्रिकोणी बंगल्याचा मालक संजय ब्रिजलाल चौधरी रा. प्लॉट नं.43, जय समाधी नगर, नंदुरबार हा त्याचे मालकीचे नमुद बंगल्यात वरील इसमांकडुन पैसे स्विकारुन पिडीत महीलांसोबत शारिरीक संबंध करायला लावून स्वतःचे बंगल्याचे जागेचा वापर देहविक्री व्यवसायसाठी करुन त्या महिलांचे देहविक्रीचे कमाईवर उदरनिर्वाह करीत होता. त्याअन्वये उपनगर पोलीस ठाण्यात भा.न्या. संहिता कलम 123, 275 सह स्त्रिया व मुली अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधि. 1956 चे कलम 3, 4, 5, 7(2)(a) सह अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 चे कलम 26 (2) (4) (5), 27(b) (e) व महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (इ) तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 33 (W) (R) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हयाचा पुढील तपास स.पो.नि.संजोग बच्छाव हे करीत आहेत.
सदरची कामगिरी नंदुरबार पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, उपनगर पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव, पोउपनि अमोल देशमुख, पोउपनि रविंद्र पवार, तसेच स्था.गु.शा. व उपनगर पोलीस ठाण्याचे पुरुष व महिला स्टाफ अशांनी केली आहे.