नंदुरबार l प्रतिनिधी
शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळामार्फत जिल्ह्यातील आदिवासी समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी शासनामार्फत स्वयंरोजगारासाठी अल्प व्याजदरावर कर्ज पुरवठा करण्यात येणार असून त्यासाठी पात्र व्यक्तींनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाचे शाखा व्यवस्थापक हितेश पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
वर्ष 2024-25 साठी नंदुरबार शाखा कार्यालयास लक्षांक प्राप्त झाला आहे. यामध्ये महिला सबलीकरण योजनेसाठी लक्षांक 70 (रुपये 2 लाख), कृषी सलग्न व्यवसायासाठी लक्षांक 66 (रुपये 5 लाख), हॉटेल/धाबा लक्षांक 15 (रुपये 5 लक्ष), ऑटो वर्कशॉप/स्पेअरपार्ट लक्षांक 15 (रुपये 5 लाख) वाहन व्यवसाय लक्षांक 06 (रुपये 10 लाख), लहान उद्योगधंदे लक्षांक 28 (रुपये 2 लाख), लघु उद्योग लक्षांक 11 (रुपये 3 लाख),ऑटोरिक्षा/ मालवाहू रिक्षा लक्षांक 06 (रुपये 3 लाख), बचत गट लक्षांक 17 (रुपये 5 लाख) या प्रकारे लक्षांक प्राप्त झाला आहे.
यासाठी शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाच्या https://loan.mahashabari.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करून आपली फाईल शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या. शाखा कार्यालय नंदुरबार येथे जमा करावी असेही आवाहन शाखा व्यवस्थापक श्री. पाटील यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.