Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबारमध्ये उज्ज्वला योजनेचा आढावा,लाभार्थ्यांसाठी अधिक सुलभ सेवा देण्याचे निर्देश

Mahesh Patil by Mahesh Patil
January 30, 2025
in राज्य
0
नंदुरबारमध्ये उज्ज्वला योजनेचा आढावा,लाभार्थ्यांसाठी अधिक सुलभ सेवा देण्याचे निर्देश

नंदुरबार l प्रतिनिधी-

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी भारत सरकारचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे उपसचिव समीरकुमार मोहंती यांनी आकांक्षित नंदुरबार जिल्ह्यातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ, तसेच इंधन कंपन्यांचे प्रतिनिधी, गॅस एजन्सीधारक, सीएससी चालक आदी उपस्थित होते.

 

बैठकीत नंदुरबार जिल्ह्यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत अधिक लक्ष्यवाटप (इष्टांक) देण्याची मागणी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी केली. तसेच इंधन कंपन्यांच्या प्रतिनिधीमार्फत कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (CSR) अंतर्गत आरोग्य व पर्यटन यासाठी काही निधी जिल्ह्यासाठी द्यावा, अशी मागणी करण्यात आली. नंदुरबार जिल्ह्यात CNG पंप उभारणी तसेच केंद्र सरकारच्या बायोगॅस प्रकल्प उभारणीबाबत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. शहरात नैसर्गिक वायूच्या गॅस पाईपलाइनसाठी अदाणी कंपनीच्या अधिकाऱ्यांचीही उपस्थिती होती.

 

अक्कलकुवा आणि अक्राणी तालुक्यातील घरांची संख्या लक्षात घेता, तिथे केवळ अनुक्रमे 42 टक्के आणि 60 टक्के एलपीजी उपलब्धता आहे. या भागातील गॅसधारकांची संख्या कमी असल्याने अधिक लक्ष देण्याची गरज आहे, असे श्री. मोहंती यांनी गॅस कंपन्यांना स्पष्ट निर्देश दिले. बैठकी दरम्यान श्री. मोहंती यांनी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अनुभवांची माहिती घेतली. महिलांनी गॅस जोडणीपूर्वीच्या समस्या, जसे की चुलीच्या धुरामुळे होणारा त्रास, भांडे जास्त काळे होणे, तसेच स्वयंपाक करण्यास लागणारा अधिक वेळ, या सर्व समस्या गॅस जोडणीमुळे दूर झाल्याने समाधान व्यक्त केले.

 

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत जिल्ह्यातील गॅस सेवांचे आणखी सुलभीकरण करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वय साधावा आणि अधिक चांगल्या सेवा द्याव्यात, असे आवाहन उपसचिव श्री. मोहंती यांनी केले.

या बैठकीला चेतन पटवारी (आयओसीएल डिव्हिजनल सेल्स हेड), इक्बाल सिद्दिकी (भारताचे माजी क्रिकेटपटू व उप महाव्यवस्थापक, इंडियन ऑइल कंपनी ), पियुष गुजराथी – (बीपीसीएल टेरिटरी मॅनेजर) जे. व्ही. अममिलेश्वर राव (एचपीसीएल क्षेत्रीय व्यवस्थापक) वीरेंद्र अहिरवार (आयओसीएल विक्री अधिकारी), हिमांशू स्वान (बीपीसीएल विक्री अधिकारी), गोपाल घडमोडे ( एचपीसीएल) विक्री अधिकारी हे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

या बैठकीत प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, तसेच गॅस जोडणी प्रक्रिया अधिक सुटसुटीत करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आल्या.

बातमी शेअर करा
Previous Post

तळोदा शहरातील समस्यांचे फोटो काढून नागरिकांनी चौकात लावले बॅनर, प्रशासनाने केला गुन्हा दाखल

Next Post

कुष्ठरोग शोध अभियान यशस्वी राबवावा : डॉ. मित्ताली सेठी

Next Post
प्रशासन अधिक कार्यक्षम आणि लोकाभिमुख करण्यासाठी 100 दिवसांचा विशेष कृती आराखडा तयार करा : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

कुष्ठरोग शोध अभियान यशस्वी राबवावा : डॉ. मित्ताली सेठी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दीपकभाई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खान्देश स्तरीय पुरुषोत्तम चषक उत्साहात

दीपकभाई पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खान्देश स्तरीय पुरुषोत्तम चषक उत्साहात

October 15, 2025
महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण २०२५ जाहीर,५० हजार कोटींची गुंतवणूक, पाच लाखांवर रोजगार निर्मिती

महाराष्ट्र बांबू उद्योग धोरण २०२५ जाहीर,५० हजार कोटींची गुंतवणूक, पाच लाखांवर रोजगार निर्मिती

October 15, 2025
जंगल नसलेल्या, ५० टक्क्यांपेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्येच्या गावांचाही ‘पेसा’मध्ये समावेश करावा : उपमुख्यमंत्री अजित पवार

जंगल नसलेल्या, ५० टक्क्यांपेक्षा जास्त आदिवासी लोकसंख्येच्या गावांचाही ‘पेसा’मध्ये समावेश करावा : उपमुख्यमंत्री अजित पवार

October 15, 2025
राजकारण करतांना भाऊबंदकी कायम ठेवा; आ. चंद्रकांत रघुवंशींच्या शिवसैनिकांना सल्ला

राजकारण करतांना भाऊबंदकी कायम ठेवा; आ. चंद्रकांत रघुवंशींच्या शिवसैनिकांना सल्ला

October 13, 2025
जिल्ह्यात 5 बोगस डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल, नऊ जणांना दिल्या नोटीस

जिल्ह्यात 5 बोगस डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल, नऊ जणांना दिल्या नोटीस

October 13, 2025
पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष  दीपकबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रम

पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपकबापू पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रम

October 13, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group