Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

महाराष्ट्रात संपूर्ण ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गान अनिवार्य करा- हिंदु सेवा सहाय्य समितीची मागणी

team by team
January 29, 2025
in राजकीय
0
महाराष्ट्रात संपूर्ण ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गान अनिवार्य करा- हिंदु सेवा सहाय्य समितीची मागणी

नंदुरबार l प्रतिनिधी-

 

राष्ट्रभक्तीचे स्फूर्ल्लिंग वंदे मातरम या गीताने होते, वंदे मातरम हे राष्ट्रगान महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला म्हणता येणे आणि त्याचा अर्थ कळणे गरजेचे आहे. महाराष्ट्र शासनाने वंदे मातरम हे राष्ट्रगान शाळा- महाविद्यालय, शैक्षणिक संस्था याठिकाणी दररोज राष्ट्र गीता सोबत तर शासकीय- निम शासकीय कार्यालय येथे स्वातंत्र्य दिवस, प्रजासत्ताक दिवस, महाराष्ट्र दिनी यादिवशी गाणे अनिवार्य करावे अश्या आशयाचे निवेदन मुख्यमंत्री, शिक्षण मंत्री यांना निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत तर आमदार डॉ विजयकुमार गावित यांना समक्ष भेटून दिले.

 

 

यावेळी आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी वंदे मातरम हे राष्ट्रगीत बंधनकारक होण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे पाठपुरावा करणार असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.

 

 

 

निवेदनात म्हटले आहे की, इ.स.१८७० मध्ये बंकिमचंद्र चटर्जी यांनी वंदे मातरम हे गीत लिहिले. १८९६ च्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात  रवींद्रनाथ टागोर यांनी प्रथम राजकीय संदर्भात गायलेल्या या गीताने भारतीय स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाची भूमिका बजावली. स्वातंत्र्य संग्रामात अनेक क्रांतिकारक हे वंदे मातरमचा घोषणा देत हुतात्मा झाले. २४ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान सभेने “वंदे मातरम” हे राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारले.याप्रसंगी भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद म्हणाले की, ” जन गण मन ” या भारताच्या राष्ट्रगीताच्या बरोबरीने या गाण्याचा देखील सन्मान केला पाहिजे.

 

 

 

 

आजही राष्ट्रभक्तीचे स्फूर्ल्लिंग वंदे मातरम या गीताने होते, वंदे मातरम हे राष्ट्रगान महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला म्हणता येणे आणि त्याचा अर्थ कळणे गरजेचे आहे यासाठी ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गान शाळा, महाविद्यालयात, शासकीय- निमशासकीय कार्यालये यांना बंधनकारक करावे अशी जनभावना आहे, जनभावनेचा आदर राखत महाराष्ट्र शासनाने वंदे मातरम हे राष्ट्रगान शाळा- महाविद्यालय, शैक्षणिक संस्था याठिकाणी दररोज राष्ट्र गीता सोबत तर शासकीय- निम शासकीय कार्यालय येथे स्वातंत्र्य दिवस, प्रजासत्ताक दिवस, महाराष्ट्र दिनी यादिवशी गाणे अनिवार्य करावे असे निवेदनात नमूद केले आहे. यावेळी हिंदु सेवा सहाय्य समितीचे डॉ नरेंद्र पाटील, जितेंद्र राजपूत, प्रविण नांदेडकर, संदीप राजपूत, पंकज डाबी, गणेश राजपूत, पंकज मुसळे आदीं उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यात सिकलसेल तपासणी मोहीमेची पालमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात, 8 लाख नागरिकांची तपासणी होणार

Next Post

वाघाळे येथे स्वास्थ्य सहेली उपक्रमाअंतर्गत स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सत्कार

Next Post
वाघाळे येथे स्वास्थ्य सहेली उपक्रमाअंतर्गत  स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सत्कार

वाघाळे येथे स्वास्थ्य सहेली उपक्रमाअंतर्गत स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

शताब्दी इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय ग्रंथालय दिन साजरा

August 13, 2026
कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

कानुबाई मातेचा विसर्जन स्थळी पाण्याची व्यवस्था व स्वच्छता करण्याची मागणी

August 13, 2026
५० पेक्षा अधिक बालक-युवकांच्या शोषणाचा आरोप; २२ वर्षीय संशयित जेरबंद

लैंगिक शोषणाच्या संशयिताची पोलीस कोठडी वाढली

August 13, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयात वृक्षदिंडी उत्साहात

August 11, 2026
भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

भालेर येथे एक पेड़ मां के नाम मोहिमे अंतर्गत वृक्षदिंडी व वृक्षारोपण

August 11, 2026
के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

के. डी. गावित सैनिकी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा

August 11, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add