नंदुरबार l प्रतिनिधी
तालुक्यातील भालेर येथील काकेश्वर विद्या प्रसारक संस्था संचलित श्रीमती क.पू .पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयत इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला .
याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव हिरामण पाटील तसेच राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष जगदीश निळकंठ सोनवणे ,संस्थेचे हितचिंतक जगदीश पाटील जून मोहिदे, हिम्मत पाटील नगाव, अभिमन्यू पाटील भालेर, शाळेच्या प्राचार्या सौ. विद्या .बी .चव्हाण , पर्यवेक्षक श्री. एम. बी. अहिरे प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षक शिक्षिका व शिक्षिकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.
यावेळी इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त केली. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी विद्यालयासाठी भेट म्हणून डिजिटल घड्याळ शाळेला भेट दिली. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष भास्करराव हिरामण पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यालयाच्या प्राचार्या सौ. विद्या .बी .चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त व तणावमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी व आरोग्याची काळजी घ्यावी असे मोलाचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.