नंदुरबार l प्रतिनिधी-
भारतातील सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नंदुरबार शहरातील श्रीनिवास सायबर कॅफेने अभिनव उपक्रम सुरू केला असून माजी सैनिकांचे सर्व सायबरचे काम मोफत करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ 15 जानेवारी रोजी सैनिकाच्या हस्ते करण्यात आला. या उपक्रमाबद्दल संचालक गणेश चौधरी यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
ज्यांनी देश रक्षणासाठी अखंड आयुष्य समर्पित केले. त्आम्ही सुरक्षित राहावे, यासाठी सुखांचा त्याग केला, बलिदान दिले, अशा सैनिकांच्या कतृर्त्वाचा सन्मान करण्यासाठी श्रीनिवास सायबर कॅफेचे संचालक गणेश चौधरी यांच्या अभिनव संकल्पनेतून सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे. दि.१५ जानेवारी रोजी भारतीय सेना दिवसाचे औचित्य साधून सर्व आजी – माजी सैनिकांचे सायबरचे सर्व कामे मोफत करण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ माजी सैनिकाचे हस्ते करण्यात आले.
यामधे स्पर्श, जीवनप्रमाणपत्र, नोकरीविषयी फॉर्म भरणे यासह सायबरशी संबंधित आजी-माजी सैनिक, वीर पत्नी, वीर मातांची विविध कामे विनामूल्य मोफत करणार आहेत. या उपक्रमाचे शुभारंभ 15 जानेवारी रोजी सायंकाळी करण्यात आला. नंदुरबार जिल्ह्यातील सर्व आजी व माजी सैनिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील यावेळी संचालक गणेश चौधरी यांनी केला. नंदुरबार शहरातील स्टेशन रोडवर श्रीनिवास सायबर कॅफे आहे. याआधी देखील पत्रकार दिनाला पत्रकारांच्या सर्व कुटुंबीयांचे सायबर वरील कामकाज मोफत करण्याची घोषणा गणेश चौधरी यांनी केली होती.