नंदुरबार l प्रतिनीधी
नंदुरबार येथील विद्यासरोज केअर हॉस्पिटलच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त आज हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबिर व आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. त्यात 26 रक्तदात्यांनी रक्तदान केले तर 80 रुग्णांची तपासणी करण्यात आली. असल्याची माहिती डॉ गौरव तांबोळी यांनी दिली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात कमी वेळात नावलौकिक झालेले व रुग्णांची सेवा करणारे विद्यासरोज क्रिटिकल केअर हॉस्पिटलचा तृतीय वर्धापन दिन साजरा करण्यात आला, यानिमित्त गरजू रुग्णांना रक्त मिळावं यासाठी रक्तदान शिबिर घेण्यात आले, तसेच परिसरातील गरजू रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली, त्यात इसीजी, शुगर, परमानंनली फंक्शन टेस्ट, ब्लड प्रेशर यासह विविध तपासण्या करण्यात आल्यात. या शिबिरात रुग्णांचे नातेवाईक व हितचिंतक यांनी रक्तदान केले.
यावेळी 26 रक्तदात्यांनी रक्तदान केले. 80 रुग्णांची तपासणी करण्यात आली. रक्तदान शिबिराचे आयोजन डॉ गौरव तांबोळी, डॉ स्वप्निल महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी सेवा ब्लड सेंटरच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. यावेळी हॉस्पिटलच्ये कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.