नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार तालुक्यातील भालेर येथील काकेश्वर विद्या प्रसारक संस्था संचलित द फ्युचर स्टेप स्कूलचा वार्षिक सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान नंदुरबारचे विभागीय पोलिस अधिकारी संजय महाजन यांनी भूषवले, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव पाटील, कार्याध्यक्ष विजय बोरसे व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला रंगत आली.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी आणि इंग्रजी गाण्यांवर नृत्य सादर करून आपली कला सादर केली. शाळेत राबविण्यात आलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांना मेडल्स आणि प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.
सूत्रसंचालन इशी आणि सूर्यवंशी यांनी केले, तर आभार प्रदर्शन निखिल पाटील यांनी केले. या कार्यक्रमाला पालक, ग्रामस्थ आणि विविध मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना दाद दिली.