तळोदा l प्रतिनिधी-
तळोदा शहरासाठी एका शाळेचे दोन खेळाडू शालेय हँडबॉल स्पर्धेत राष्ट्रीय पातळीवर निवड झाली आहे.
शिक्षण महर्षी प्राचार्य भाईसाहेब गहू महाजन व शी.ल.माळी कनिष्ठ महाविद्यालय तळोदा येथील दोन खेळाडूंची निवड राष्ट्रीय स्पर्धा साठी निवड झाली असून दीपिका छापोला व जानवी राजपूत या इयत्ता १२ वी इयत्तेत शिक्षण घेत असून नुकतेच महाराष्ट्र राज्य शालेय हँडबॉल स्पर्धे अंतर्गत राज्यस्तरीय स्पर्धा १९वर्ष आतील मुली बुलढाणा येथे आयोजित करण्यात आल्या होत्या.
त्यात त्यांची निवड राष्ट्रीय पातळीवर झाली होती.नुकत्याच पंजाब राज्यातील लुधियाना येथे पार पडलेल्या राष्ट्रीय हँडबॉल स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग नोंदवला सदर निवडी बाबत संस्थेच्या अध्यक्षा मंगलाताई महाजन कॉलेज ट्रस्टचे संचालक अरुण कुमार महाजन, शाळेचे प्राचार्य अमरदीप महाजन, उपमुख्याध्यापक एस . सी.खैरनार, पर्यवेक्षक ए. एल. महाजन, अमरीश सूर्यवंशी तसेच सर्व संचालक मंडळ व शिक्षक यांनी अभिनंदन केले आहे
एकाच शाळेतील दोन खेळाडू राष्ट्रीय खेळाडू म्हणून निवड होणे निश्चितच गौरवाची बाब असल्याचे प्राचार्य अमरदीप महाजन यांनी सांगितले
इयत्ता ६ वी पासून सदर खेळाडू हे नियमित हँडबॉल खेळ खेळत होते मागील तीन वर्ष पासून शालेय हँडबॉल स्पर्धेत तळोदा संघाने दोन वेळा उपविजेता तर एक तिसरे स्थान पटकावले होते .
खेळाडूंना क्रीडा शिक्षक सुनील सूर्यवंशी यांचे मार्गदर्शन लाभले.