नंदुरबार l प्रतिनिधी-
दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर नंदुरबार तालुक्यातील समशेरपूर येथील आयान साखर कारखान्याचा बाॅयलर अग्नी प्रदिपन समारंभ उत्साहात पार पडला या वेळी बाॅयलर पुजन कारखान्याचे मुख्य अभियंता अनिल चोपडे व त्यांच्या सुविदय पत्नी यांचे हस्ते पार पडला.
या वेळी कारखान्याचे संचालक सचिन सिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी आर .सी.बडगुजर तसेच सर्व अधिकार व कर्मचारी उपस्थित होते. चालू वर्षी कोरोना सदृश परिस्थिती विचारात घेता मोजक्याच लोकांचे उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.या वेळी बोलताना संचालक सचिन सिनगारे यांनी सांगितले की, मागील वर्षाचे संपुर्ण केन पेमेंट एकरकमी व वेळेत अदा केल्यामुळे साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य यांनी जाहीर केलेल्या नामांकन यादीत आपल्या कारखान्यास उत्कृष्ठ असे नियोजन,एकरकमी व वेळेत पेमेंट चे ग्रीन नामांकन दिले असुन या मध्ये महाराष्ट्रातील मोजक्याच कारखान्यांचा समावेश असुन यात आपण आहोत हि गौरवाची बाब आहे.या मध्ये शेतकरी,तोडणी व वाहतूकदार तसेच कर्मचारी यांचा देखील मोलाचा वाटा असल्याचे सांगितले. यामुळे या वर्षीचा हंगाम चालु करणेसाठीचा साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य यांचा गाळप परवाना देखील आपल्याला प्राप्त झालेला आहे. सालाबादाप्रमाणे गळीत हंगाम 2021- 22 साठी तोडणी व वाहतुक सह सर्व यंत्रणा सज्ज असून तोडणी व वाहतुक यंत्रणा येण्यास सुरुवात देखील झालेली आहे. वाढीव गाळप क्षमतासह वीज निर्मिती प्रकल्प पूर्ण क्षमतेने कारखाना 3-4 दिवसांत गाळपास सुरूवात करेल.यावर्षी देखील भागातील संपूर्ण उसाचे गाळप करण्याचे नियोजन आहे. या वर्षी कारखान्याचे 11 ते 12 लाख मे.टन ऊसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट असुन ऊस दर आणि वेळेत पेमेंटची विश्वासार्हता कायम राहील अशी ग्वाही या निमित्ताने दिली.तसेच परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी आपला ऊस कारखान्याकडे द्यावा,असे आवाहन देखील केले.यावेळी संचालक सचिन सिनगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी आर.सी.बडगुजर यांनी विजयादशमीच्या निमित्ताने आयान शुगर मागील सर्व सीमा ओलांडून आव्हानांच्, यशाच शिखर गाठुन नवीन सुरूवात करेल असा संकल्प केला. विजयादशमीच्या व येणारे गळीत हंगाम साठी सर्व शेतकरी,कंत्राटदार व कर्मचारी यांना शुभेच्छां दिल्या.








