नंदुरबार l प्रतिनिधी-
जागतिक हात धुवा दिनानिमित्त येथील जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीत जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा ॲड
. सीमा वळवी व मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या उपस्थितीत हात धुण्याचे प्रात्यक्षिक करण्यात आले .
आंतरराष्ट्रीय स्तरावर सन 2008 पासून दिनांक 15 ऑक्टोबर हा दिवस जागतिक हात धुवा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो . स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) जिल्हा परिषद नंदुरबार, एन.एस.इ. फाउंडेशन व फिनिश सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद प्रशासकीय इमारतीत हात धुण्याचे प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती रतन पाडवी,जिल्हा परिषद सदस्य रुपसिंग तडवी,वंदना पटले,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पावस्व)डॉ. वर्षा फडोळ,जिल्हा आरोग्य अधिकारी महेंद्र चव्हाण आदि उपस्थित होते.
यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांना हात धुण्याचे महत्त्व आणि त्यामुळे होणारे आरोग्यदायी फायदे याबाबत माहिती फिनिश सोसायटीचे नितीन महानुभाव यांनी दिली. तर स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) कार्यक्रम व्यवस्थापक सुनील पाटील यांनी हात कसे धुवावेत याविषयी माहिती दिली. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरानी हात धुण्याच्या सहा टप्पे याप्रमाणे हात धुवून प्रात्यक्षिक करून दाखविले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार फिनिश सोसायटीचे बीसीसी अधिकारी मंगेश निकम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पाणी व स्वच्छता कक्षाचे तज्ञ/सल्लागार व फिनिश सोसायटीचे सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.








