नंदुरबार l प्रतिनिधी
डॉ. सुप्रियाताई गावित यांच्या ठोस पाठपुराव्यामुळे नंदुरबार जिल्ह्याला तब्बल 33 नवीन ॲम्बुलन्स उपलब्ध झाल्या असून, आरोग्य क्षेत्रात मोठी भर पडली आहे. जिल्ह्यातील दुर्गम भागांमध्ये आरोग्य सेवा अधिक सुलभ होण्यासाठी 26 लहान ॲम्बुलन्सचीही मागणी केली असून नर्मदा किनाऱ्यावरील गावांसाठी बोट-ॲम्बुलन्सची व्यवस्था होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
डॉ. गावित यांनी सांगितले, “गेल्या काही वर्षांपासून सातत्याने या मागण्या केल्या जात होत्या. आज शासनाच्या सहकार्याने त्या पूर्ण झाल्या, याचा मला आनंद आहे.”
नंदुरबारसाठी ही ऐतिहासिक उपलब्धी असून, डॉ. सुप्रियाताई गावित यांच्या ठोस नेतृत्वाचे जनतेतून कौतुक होत आहे.