Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आरोग्य यंत्रणा सक्षमकरण्यासाठी प्रयत्न : हेमलता शितोळे

team by team
December 4, 2024
in राजकीय
0
आरोग्य यंत्रणा सक्षमकरण्यासाठी प्रयत्न : हेमलता शितोळे
नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत असून प्रत्येक तालुक्यांसाठी ॲम्बुलन्स उपलब्ध करण्यात आल्या असून नुकत्याच 33 ॲम्बुलन्स राज्य शासनाकडून प्राप्त झाल्या आहेत त्यांचे काल दि.3 डिसेंबर रोजी जि.प.बांधकाम सभापती हेमलता शितोळे यांच्या हस्ते पूजन करून जिल्हाधिकारी डॉ.मिताली सेठी यांच्या उपस्थितीत हिरवी झेंडी दाखवून वाटप करण्यात आल्या. या ॲम्बुलन्सचे उद्घाटन नुकतेच जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित यांच्या हस्ते झाले होते.
     याबाबत हेमलता शितोळे यांनी सांगितले की, नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागासह विविध ठिकाणी रुग्णांची हेळसांड होऊ नये म्हणून 33 ॲम्बुलन्ससाठी प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करण्यात आला होता. यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित  तसेच सभापती हेमलता शितोळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर रवींद्र सोनवणे यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून राज्य शासनाकडे मागणी केली होती. तसेच काही तालुक्यांमध्ये ॲम्बुलन्स उपलब्ध व्हाव्यात यासाठी काही तक्रारीदेखील प्राप्त झाल्या होत्या. यावेळी त्यापुढे म्हणाल्या की, रुग्णांच्या नातेवाईकांना ॲम्बुलन्स तत्काळ उपलब्ध व्हावी यासाठी दुर्गम भागात विविध ठिकाणी नेटवर्कचा अभाव असल्याने त्या ठिकाणी कनेक्टिव्हिटीसाठी देखील राज्य शासनाकडे प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती हेमलता शितोळे यांनी दिली आहे.
      नंदुरबार जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांना ॲम्बुलन्सचे वाटप करण्यात आले असून यात अक्कलकुवा तालुक्याला ९, शहादा ९ व नवापूर ४, नंदुरबार, ४, धडगाव ४ आणि तळोदा तालुक्यासाठी २  ॲम्बुलन्स वाटप करण्यात आल्या असून जिल्ह्यात यापूर्वी ६१ ॲम्बुलन्स विविध आरोग्य केंद्रांना  देण्यात आल्या आहेत  अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी रवींद्र सोनवणे यांनी दिली आहे. दरम्यान ३३ ॲम्बुलन्स वाटपाप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ मित्ताली सेठी,  मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, जिल्हा परिषद आरोग्य व बांधकाम सभापती हेमलता शितोळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ रवींद्र सोनवणे आदी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

डॉ. सुप्रिया गावित यांचा दूरदृष्टीपूर्ण निर्णय; नंदुरबार जिल्ह्याला 33 नवीन ॲम्बुलन्स उपलब्ध

Next Post

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून राजपालसिंग मेमोरियल संस्थेतर्फे विविध उपक्रम

Next Post
प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून राजपालसिंग मेमोरियल संस्थेतर्फे विविध उपक्रम

प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून राजपालसिंग मेमोरियल संस्थेतर्फे विविध उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

नंदुरबार जिल्ह्यात 89 रुग्णांना सुमारे 84 लाखांची मदत

April 26, 2026
२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

२४ तासांच्या आत घरफोडीचा गुन्हा उघड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

April 26, 2026
शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

शहाद्यात डॉ हिना गावित यांच्या हस्ते कामगारांना भांडे संच वितरित

April 26, 2026
नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

नवापूर हद्दीत अवैध दारू साठा जप्त, 93 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

April 26, 2026
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीची केली विचारणा

April 26, 2026
जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

जयेश राऊळ यांना आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार, कामाची मिळाली पावती; प्रशासनाकडून होणार गौरव

April 25, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add