नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात
1 हजार 434 मतदान केंद्र सज्ज झाले असून या ठिकाणी 6600 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.उमेदवाराच्या प्रचारासाठी आलेल्या राजकीय कार्यकर्त्यांनी आपला मतदार संघ व मतदार नसल्यास सदरचा मतदार संघ तत्काळ सोडून जाण्याचे आदेश देण्यात आला आहे
दरम्यान मतदानाच्या ठिकाणी मोबाईल घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली असून. असे आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी दिला.
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार, नवापूर या मतदारसंघात बुधवार 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.चार विधानसभा मतदारसंघात 1 हजार 434 मतदान केंद्र सज्ज झाले असून या ठिकाणी 6600 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.ज्यांना व्होटर स्लिप मिळाली नाही त्यांनी निवडणूक विभागाच्या टोल फ्री (१९५०) क्रमांकावर तक्रार करावी. त्यांचे निरसन केले जाणार आहे.जेथे विजेची सोय नाही किंवा वीजपुरवठा होऊ शकणार नाही अशा ठिकाणी सोलर दिवे लावण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत.
मोबाइल नेटवर्क नसलेल्या ६९ मतदान केंद्रांमधील माहिती व मतदानाची टक्केवारी मिळवि- ण्यासाठी रनरची मदत घेतली जाणार आहे. त्यांच्या नियुक्त्त्या यापूर्वीच करण्यात आल्या असून, आवश्यक ते प्रशिक्षणही त्यांना देण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, मतदानाच्या ठिकाणी मोबाईल घेऊन जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. मतदान केंद्राच्या परिसरात मोबाईल आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा त्यांनी दिला.
*राजकीय कार्यकर्त्यांनी मतदारसंघ सोडावा*
नंदुरबार जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकांसाठी विविध उमेदवारांच्या प्रचारासाठी राजकीय कार्यकर्ते बाहेरगावात मोठ्या प्रमाणावर येतात. मात्र प्रचार संपल्यानंतर अनेक कार्यकर्ते नेते मतदार नसतानाही मतदारसंघात उपस्थित राहतात. त्यांच्या उपस्थितीमुळे मुक्त व निष्पक्ष मतदानाचे वातावरण धोक्यात येते. म्हणून अशा राजकीय कार्यकर्त्यांनी मतदार नसल्यास मतदारसंघ सोडण्याचा आदेश देण्यात आला आहे.अशा कार्यकर्त्यांनी प्रचार कालावधी संपताच तत्काळ मतदार संघ सोडला याची सुनिश्चिती जिल्हा निवडणूक प्रशासन व पोलिस प्रशासनाने करावी. ज्या ठिकाणी कार्यकर्ते निवासासाठी थांबले आहे तेथे बाहेरील असलेल्या लोकांना शोध घेवून पडताळणी करावी असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी दिला.