नंदुरबार l प्रतिनिधी-
अक्कलकुवा-धडगाव विधानसभा मतदार संघाचा विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी या मतदार संघातून उमेदवारी करत आहे. या मतदार संघात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत महिला सक्षमीकरणावर भर देणार असल्याचे डॉ.हिना गावित म्हणाल्या. दुर्गम भागात आयोजित कॉर्नर सभांप्रसंगी त्या बोलत होत्या. डॉ.हिना गावितांच्या कॉर्नर सभांमध्ये दुर्गम भागामध्ये प्रतिसाद पहायला मिळाला.
यापुढे डॉग़ावित म्हणाल्या की,अक्कलकुवा-धडगाव विधानसभा मतदार संघात खासदारकीच्या १० वर्षात गाव-पाड्यांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला आहे. ८६ गावे व ७६३ वाड्या-पाड्यांपर्यंत वीज पोहचविण्याचा प्रयत्न केला. यासाठी केंद्र सरकारच्या विद्युतीकरणाच्या योजनांसाठी पाठपुरावा केला. या भागात कुपोषण, स्थलांतराची मोठी समस्या आहे. आरोग्याच्या समस्या होत्या. यामुळे गेल्या दहा वर्षात येथील रहिवाश्यांना आरोग्य सुविधा मिळवुन देण्यासाठी प्रयत्न केला.
रोजगार नसल्याने स्थलांतर थांबविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विविध योजनांच्या माध्यमातून महिलांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. दुर्गम-अतिदुर्गम मतदार संघ असला तरी अनेक गाव पाड्यांपर्यंत रस्ते पोहचवून दळण-वळण सोयीचे करण्याचा प्रयत्न केला आहे. येणाऱ्या काळामध्ये रोजगार, दळणवळण, महिला सक्षमीकरण व आरोग्याच्या सुविधा बळकट करण्यासाठी आपला प्रयत्न असल्याचे डॉ.ग़ावित म्हणाल्या.