नंदुरबार l प्रतिनिधी-
भाजपा महायुतीचे उमेदवार मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी नंदुरबार शहरातून सलग प्रचार फेऱ्या सुरू ठेवल्या असून नागरिकांचा मोठा प्रतिसाद दिसून येत आहे. विविध सामाजिक संघटना व अन्य क्षेत्रात कार्यरत संस्था संघटनांचा देखील दिवसेंदिवस जाहीरपणे पाठिंबा देणे वाढत आहे.
भाजपा महायुतीचे उमेदवार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी महाराष्ट्र व्यायाम शाळा, बालाजीवाडा, कुंभारवाडा, गुजरन्हावी गल्ली, मोतीनाला, गोंधळी गल्ली, मेहतर वस्ती, भरवाड गल्ली, बाहरेपुरा, संत रोहिदास चौक, हाटदरवाजा, 1 नंबर शाळा, तांबोळी गल्ली, लक्ष्मीनगर, नेहरूपुतळा, बस स्टॅन्ड परीसर, कंजरवाडा परिसर, महाराणा पुतळा या भागात प्रचार फेरीच्या माध्यमातून संवाद साधला. निवडणूक गीते, जागो जागी फडकणारे भगवे झेंडे, लाडक्या बहिणीं प्रमाणेच युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती, त्या त्या भागातील मान्यवरांनी घेतलेला उत्स्फूर्त सहभाग आणि प्रत्येक चौकात प्रत्येक ठिकाणी डॉक्टर विजयकुमार गावित यांच्यासह मान्यवरांचे होणारे उत्स्फूर्त स्वागत हे या रॅलीचे मोठे वैशिष्ट्य ठरले. मराठा समाज, भारवड समाज, कंजर समाज, जैन समाज, बौद्ध समाज, मेहतर समाज अशा विविध समाज संघटनांमधील प्रमुख मान्यवर रॅलीतून त्यांच्या समवेत दिसले महिलांचा सहभाग विशेष उल्लेखनीय ठरला.
नंदुरबार शहरात आज देखील भाजपा महायुतीच्या वातावरण निर्मितीने उंची गाठलेली दिसली. मतदारांकडून त्याला मोठा प्रतिसाद लाभल्याचे पहायला मिळाले. मागील तीस वर्षापासून चालू असलेला नंदुरबार शहराचा आणि जिल्ह्याचा विकास कायम राखण्यासाठी डॉक्टर विजयकुमार गावित यांच्यासारख्या दूरदृष्टीच्या नेत्यालाच पुन्हा निवडून द्या, असे आवाहन प्रचार फेरीतील पदाधिकारी करताना दिसले.
त्यांच्या समवेत ज्येष्ठ नेते पुखराज जैन,
भाजपाचे तालुका अध्यक्ष जे एन पाटील, डॉक्टर विक्रांत मोरे, माजी उपनगराध्यक्ष श्याम बापू मराठे, माजी गट नेते चारुदत्त कळवणकर, मोहन खानवाणी, आनंद माळी, लक्ष्मण माळी, माणिक माळी, नरेंद्र माळी, संतोष भाऊ वसईकर, रिपब्लिकन पार्टीचे सुभाष पान पाटील, केतनभैया रघुवंशी, धनराज गवळी, पावभा मराठे, जिल्हा महामंत्री सदानंद रघुवंशी, भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते प्रकाश छगन चौधरी, ईश्वर धामणे, आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त युवराज पाटील, जगदीश पाटील, संजू भाई शहा, जितेंद्र मराठे, योगेश पाटील, सपना अग्रवाल, संगीता सोनवणे, काजल मच्छले, सरिता चौधरी, दिव्या जोशी, रत्ना चौधरी, सुरेखा पाटील, अर्जुन मराठे, निलेश चौधरी व अन्य कार्यकर्ते पदाधिकारी व नागरिक सहभागी होते.