नंदुरबार l प्रतिनिधी-
विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी, नंदुबार जिल्ह्यातील अक्कलकुवा, शहादा, नंदुरबार व नवापुर या चारही विधानसभा मतदार संघासाठी, भारताच्या निवडणूक आयोगाने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मुख्य, खर्च व पोलीस निरिक्षकांची नियुक्ती केली असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी कळविले आहे.
*अक्कलकुवा व शहादा विधानसभा मतदार संघासाठी मुख्य निवडणूक निरिक्षक म्हणून* भारतीय प्रशासन सेवेतील अन्नवी दिनेश कुमार (भा.प्र.से.) यांची नियुक्ती करण्यात आली असून ते अस्तंभा कक्ष, सर्किट हाऊस, टोकरतलाव रोड, नंदुरबार येथे वास्तव्यास असणार असून त्यांच्या संपर्कासाठी त्यांच्या संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 02564-299534 व मोबाईल क्रमांक 9284055760 असा आहे.
*नंदुरबार व नवापूर विधानसभा मतदार संघासाठी मुख्य निवडणूक निरिक्षक म्हणून* भारतीय प्रशासन सेवेतील अजय यादव (भा.प्र.से.) यांची नियुक्ती करण्यात आली असून ते सातपुडा कक्ष, सर्किट हाऊस, टोकरतलाव रोड, नंदुरबार येथे वास्तव्यास असणार असून त्यांच्या संपर्कासाठी त्यांच्या संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक 02564-299534 व मोबाईल क्रमांक 8459695498 असा आहे.
*निवडणूक खर्च निरिक्षक म्हणून* भारतीय महसूल सेवेतील गौतम कुमार (आय.आर.एस.) यांची नियुक्ती करण्यात आली असून ते गिरनार कक्ष, सर्कीट हाऊस, टोकरतलाव रोड, नंदुरबार येथे वास्तव्यास असणार आहेत. तसेच त्यांच्या संपर्कासाठी त्यांचा दूरध्वनी क्रमांक 02564-299534 व मोबाईल क्रमांक 9322628442 असा आहे.
*निवडणूक पोलीस निरीक्षक म्हणून* भारतीय पोलीस सेवेतील शाहिद मेहराज राथेर (भा.पो.से.) यांची नियुक्ती करण्यात आली असून ते सह्याद्री कक्ष, सर्कीट हाऊस, टोकरतलाव रोड, नंदुरबार येथे वास्तव्यास असणार आहेत. तसेच त्यांच्या संपर्कासाठी त्यांचा दूरध्वनी क्रमांक 02564-299534 व मोबाईल क्रमांक 8459677752 असा आहे.
नागरीकांनी कृपया याची नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी केले आहे.