Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

आदिवासी बांधवांसाठी सावऱ्या दिगर चा पुल ठरेल विकासाचा सेतू : डॉ. विजयकुमार गावित

team by team
October 14, 2024
in राजकीय
0
आदिवासी बांधवांसाठी सावऱ्या दिगर चा पुल ठरेल विकासाचा सेतू : डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार l जिमाका

शासनाच्या आदिवासी विकास विभागाने बिलगांव ते सावऱ्या दिगर येथील पुलासाठी 45 कोटींचा निधी मंजुर केल्यामुळे येत्या एक ते दिड वर्षात हा पुल पुर्णत्वास येवून, या अतिदुर्गम भागातील बारा ते पंधरा हजार आदिवासी बांधवांसाठी हा पुल विकासाचा सेतू ठरेल, असा विश्वास राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी व्यक्त केला आहे.

 

गेल्या बारा वर्षापासून निधी अभावी रखडलेल्या बिलगाव ते सावऱ्या दिगर येथील उदई नदीवरील पुल आणि बोधी नाल्यावरच्या पुलांच्या कामाचे भूमीपूजन मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी यावेळी माजी खासदार डॉ हिना गावित, बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता कुणाल पावरा, विज वितरणचे उपकार्यकारी अभियंता जगदिश पावरा, तालुका वैद्यकीय अधिकारी कांतीलाल पावरा , सुभाष पावरा , शिवाजी पराडके, राड्या पावरा , जोमा पावरा, दिलीप सरंपच, खुशाल पावरा, लितिश मोरे, हिरालाल काळूसिंग यांच्यासह परिसरातील गावचे सरपंच आणि ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

 

 

नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्राणी तालुक्यातील अतिदुर्मग भाग असलेल्या सावऱ्या दिगरच्या पुलाचे काम गेल्या अनेक वंर्षापासून निधी अभावी रखडले होते. 2012 साली मान्यता मिळालेल्या या पुलासाठी भरीव निधीची गरज होती. मंत्री डॉ विजयकुमार गावित यांनी आदिवासी विकास विभागातूना यासाठी 45 कोटींच्या भरीव निधीला मान्यता देत या कामाची निविदा प्रक्रीया देखील पुर्ण केली. त्यांच्या हस्ते या रखडलेल्या पुलाचे काम महिन्या दिड महिन्यात सुरु होणार आहे. या 45 कोटींमध्ये या भागातील उदई नदीवरील सावऱ्या दिगरच्या पुलासह बोधी नाल्यावरच्या पुलाचे काम देखील होणार आहे. मुळातच या पुलाअभावी या भागातील 08 गाव आणि अनेक पाड्यातील लोकांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागत होता. आरोग्य यंत्रणेला देखील याठिकाणी पोहचण्यात मोठी अडसर निर्माण होत होती. तर पावसाळ्यात पाणी आल्याने या भागाती गावांचा संपर्क तुटत असल्याने महसुल यंत्रणेला देखील स्वस्त धान्य दुकानाचे चार महिन्याचे रेशन एकाचवेळी गावात पोहचवून ठेवावे लागत होते. त्यामुळे या गाव परिसरातील नागरीकांनी या पुलाच्या बांधकामासाठी आदिवासी विकांसमंत्री यांनी साकडे घातले होते.

 

 

या पुलाच्या उदघाटनावेळी हा पुल या भागातील बारा ते पंधरा हजार आदिवासी बांधवांना शासनाच्या योजना तळागाळापर्यंत पोहचवण्यासाठी विकास सेतू म्हणून उपयोगात येईल असा विश्वास मंत्री डॉ विजयकुमार गावितांनी व्यक्त केला. या भागातील आदिवासी बांधवांच्या विकासासाठी राज्यातील शासन कटीबद्ध असून आदिवासी बांधवांना मागेल ती योजना देण्यासाठी आपण नेहमीच तत्पर असल्याचेही यावेळी मंत्री डॉ विजयकुमार गावित म्हणाले. या पुलाप्रमाणेच या भागातील रस्ते आणि विद्युतीकरणासाठी देखील मोठी निधी मंजुर करुन दिला असून येत्या दोन तीन महिन्यात अनेक वाड्या- पाड्यांपर्यत वीज पोहचून वीज समस्येचे निराकरणे होईल असा विश्वास देखील मंत्री डॉ विजयकुमार गावितांनी येथील नागरिकांना दिला.

 

या पुलामुळे या भागातल्या सावऱ्या दिगर, बमाना, उडद्या, खोपरगाव. मांजरी, मुखानी, बादल अशा मोठ्या गावांना जाण्याचा जवळचा मार्ग प्रस्थापित होणार असल्याने या ग्रामस्थांचा तालुका मुख्यालयाचा प्रवास सुकर होणार असल्याचे यावेळी माजी खासदार डॉ. हिना गावित म्हणाल्या. आश्रमशाळांच्या बळकीटकरणातून आदिवासी विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि सोईसुविधांयुक्त शिक्षण, शबरी घरकुल योजनेच्या माध्यमातून आदिवासी बांधवांसाठी घरकुल, लाडक्या बहिण योजनेच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण, शबरी महामंडळाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांच्या हाताला काम, अशा विविध योजनांच्या माध्यमातून तळागाळातील आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सरकारकडून सुरु असल्याचे देखील यावेळी माजी खासदार डॉ हिना गावित म्हणाल्या.

बातमी शेअर करा
Previous Post

मनरेगातून 15 गावांमधील 25 कोटी रुपये खर्चाच्या 115 कामांना मंजुरी; मंत्री डॉ. गावित यांच्यामुळे ग्रामपंचायतींना लाभ

Next Post

एलआयसीतर्फे अरुण महाजन यांना सतत पाचव्यांदा एमडीआरटी बहुमान

Next Post
एलआयसीतर्फे अरुण महाजन यांना सतत पाचव्यांदा एमडीआरटी बहुमान

एलआयसीतर्फे अरुण महाजन यांना सतत पाचव्यांदा एमडीआरटी बहुमान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

नगरपालिका हद्दीतील १३ रस्त्यांच्या कामातील जन हित याचिकेत कारणे दाखव नोटीस: खंडपीठाचे आदेश

August 22, 2026
जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

जलसंधारणाचा वसा लोकचळवळीतून पुढे नेऊया: जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

August 22, 2026
जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

जिल्ह्यात विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

August 22, 2026
जलतरण तलावाची वाढीव फी कमी करण्याची सर्वसाधारण सभेत मागणी; हिरालाल चौधरी यांचे निवेदन

जलतरण तलावाची वाढीव फी कमी करण्याची सर्वसाधारण सभेत मागणी; हिरालाल चौधरी यांचे निवेदन

August 22, 2026
हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

August 20, 2026
जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन

जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन

August 20, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add