नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार शहरातील परदेशीपुरा भागात सुरू असलेल्या क्रीडा क्लबमध्ये अवैधरित्या सुरु असलेल्या जुगार अड्डयावर पोलिसांनी धाड टाकत पावणे सात लाखांचा मुद्देमाल हस्तगत करून आला ३७ संशयितांना ताब्यात घेतले आहे.
नंदुरबार शहर हद्दीतील परदेशीपुरा परिसरातील नविन नगरपालिकेच्या पाठीमागे असलेल्या क्रीडा भवन क्लब येथे दि.७ रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास संदीप अरुण चौधरी हा क्रीडा भवन क्लबच्या परवान्याचा गैरवापर करुन जुगार खेळवित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, शहर पोलीस निरीक्षक सुनिल भाबड यांच्या पथकाने क्लबवर छापा टाकला असता याठीकाणी पोलिसांना ५२ व २७ पत्त्यांचा खेळ सुरु असल्याचे आढळून आले.पोलिसांनी याठिकाणी उपस्थित असलेल्या संशयितांना ताब्यात घेतले.
त्यांच्याकडून सहा लाख ७२ हजार १० रुपये मुद्देमाल हस्तगत केला.मुद्देमालात मोबाईल, रोकड आदी साहित्याचा समावेश आहे.याप्रकरणी पोलिसांनी क्रीडा मंडळ चालक संदीप अरुण चौधरी, रमेश लालचंद मोहनानी, सागर संजय बर्डे, शंकर गंगाराम गवळी, संजय प्रकाश बालाणी, तुषार नामदेव खेडकर, मुकेश हिम्मतलाल ठक्कर, राजेंद्र कोचरु पाडवी, चंद्रशेखर नारायण पाटील, सुलतान अहमद अमिनोद्दीन शेख, संतोष नामदेव पाटील, महेंद्र वनजी चौधरी, किरण साहेबराव पाटील, शुभम वामन जाधव, श्याम प्रेमचंद सोलंखी, प्रकाश एकनाश मगर, प्रशांत भिका चौधरी, जगदीश गोरख चौधरी, अजितसिंग ज्योतीसिंग राजपाल, विनोद मधुकर नेतले, जयंती धाकु अहिरे, करण वामन जाधव, चेतन दिलीप चौधरी,
भरत बाबुलाल खंडेलवाल, प्रमोद रघुनाथ तांबोळी, शेख मेहमुद शेख मुनिर, महेश सत्यनारायण सारडा, साजिद शेख मुनीर, विकी रविंद्र शिंदे, मनिष अशोक सांखला, रफिक शेख सलीम शेख, विशाल शिवाजी लकडे, अमजद शब्बीर पठाण, सुशिल छगन तांबोळी, प्रशांत सुरेश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.क्रीडा क्लबमध्ये दारु बाळगण्याचा कोणताही परवाना नसतांना तेथे दारु पितांना व बाळगतांना मिळून आल्याने तसेच परशुराम दशरथ पाडवी व इफ्तेखार शेख कासम पिंजारी हे क्लब चालक यास मदत करतांना मिळून आले.यामुळे त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उप विभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, शहर पोलीस निरीक्षक सुनिल भाबड, स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि – मुकेश पवार, पोउपनि विकास गुंजाळ तसेच स्थागुशा पथक व शहर पोलीस ठाणे पथक आदींच्या पथकाने केली असून याप्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विकास गुंजाळ करत आहेत.