नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील भालेर येथील काकेश्वर विद्या प्रसारक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव हिरामण पाटील यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला.
श्रीमती क.पू. पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात संस्थेचे संस्थापक अध्यक भास्कराव हिरामण पाटील यांचा ७६ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया विजयकुमार गावित. जिजामाता कॉलेजचे माजी प्राचार्य डॉ. बि. एस. पाटील, चिंतामणी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष युवराज पाटील,माजी प्राचार्य डॉ. एन. डी .नांद्रे, कानळदेचे सरपंच दीपक पाटील, भालेरच्या माजी सरपंच, संस्थेच्या संचालिका बेबीताई भास्करराव पाटील का.वि. प्र संस्थेचे कार्याध्यक्ष ना विजय पाटील यांनी शुभेच्छा पाठवल्या, उपाध्यक्ष चंद्रशेखर भास्करराव पाटील, प्राध्यापिका तथा ग्रा. पं. सदस्या सौ कविता चंद्रशेखर पाटील , भाजपचे माजी तालुका अध्यक्ष .दीपक पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक दिनेश पाटील, मनसे तालुका अध्यक्ष राकेश माळी ,विठोबा माळी ,माजी सरपंच रवींद्र बागुल व पंचक्रोशीतील संस्थेवर प्रेम करणारे संस्थेचे हितचिंतक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते , माजी पर्यवेक्षक पी.पी. बागुल , प्राचार्या सौ विद्या चव्हाण, खोकराळे येथील माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. जी. सैदाणे यांनी मनोगत व्यक्त केले.
तसेच हितचिंतक पंचक्रोशीतील संस्थेवर प्रेम करणारी मंडळी सर्वांनी श्री.पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व कार्याचा गुणगौरव केला. वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही. व्ही. इसी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेतील सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले .