नंदुरबार l प्रतिनिधी
नवरात्रमध्ये नंदुरबार शहरात श्रीखोडीयार देवीची यात्रा भरते, या यात्रेमध्ये मंदिर परिसरात वेगवेगळी दुकाने लावली जातात आणि त्या दुकानांमध्ये भाविकांना आकर्षित करण्यासाठी गाणी वाजविली जातात, त्यात सिनेमांचा गीतासह अश्लिल गाणीसुद्धा वाजविली जातात सिनेमाची गाणी दुकानदार यांनी वाजवू नयेत् याऐवजी हिंदूंची धार्मिक गीते, देवीची भजन, श्लोक, मंत्र वाजवावे या आशयाचे निवेदन शहर पोलीस निरीक्षक सुनिल भाबड यांना हिंदु सेवा सहाय्य समितीच्यावतीने देण्यात आले.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, यात्रेला आलेले विकृत स्वरूप काही विकृत लोकांमुळे आले आहे.
दुकानदार वेगवेगळ्या गावातून नंदुरबार शहरात श्रीखोडीयारदेवी यात्रेत आपला उदरनिर्वाहपोटी व्यवसाय करण्यासाठी येतात. व्यवसाय करत असतांना यात्रेत लाऊडस्पीकरद्वारे वेगवेगळी गाणी वाजवीत असतात. त्यात बहुतेक व्यवसायिक हे सिनेमाची गाणी तर काहीजण अश्लील गाणी सुध्दा वाजवीत असल्याचे गेल्या वर्षी लक्षात आले होते. नवरात्र हा हिंदूंच्या पवित्र उत्सव आहे,
भाविक श्रद्धेने देवीचा दर्शनासाठी येतात परंतु काही दुकानदार सिनेमातील गाणी वाजवीत असल्याने उत्सवाचे पावित्र्य नष्ट होते. सिनेमांचा गाणी किंवा अश्लील गीतमुळे छेडखाणीचे प्रकार होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
म्हणून दुकानदारांना सिनेमांची गाणी ऐवजी हिंदूंची धार्मिक गीते, देवीची भजन, श्लोक, मंत्र असे लाऊडस्पीकरवर वाजवून देवीचा यात्रा परिसरातील पावित्र्य राखावे या आशयाचे निवेदन देण्यात आले. निवेदन देतांना हिंदु सेवा सहाय्य समितीचे नरेंद्र पाटील, जितेंद्र राजपूत, राजू चौधरी, सुयोग सुर्यवंशी, उज्वल राजपूत, जयेश भोई,,पंकज डाबी, पंकज मुसळे आदी उपस्थित होते.