नंदुरबार l प्रतिनिधी
हिंदु सेवा सहाय्य समितीचा लढ्याला यश, ‘आनंदाचा शिधा’ पिशव्यांवरील देवी देवतांची चित्रे महाराष्ट्र शासनाने हलविली.
महाराष्ट्रात विविध सण उत्सवानिमित्त आनंदाच्या शिधाचे वितरण करण्याच्या निर्णय महायुती सरकारने घेतला. हा ‘आनंदाचा शिधा’ ज्या पिशव्यांवर देण्यात येतो यापूर्वीही त्यावर भगवान गणराय, प्रभू श्रीराम, छ. शिवाजी महाराज यांचे छायाचित्रे छापली होती. सदर पिशवी ही टिकाऊ नसून टाकाऊ असल्याने त्या पिशव्या नको त्याठिकाणी पडलेल्या अवस्थेत मिळून आलेल्या आहेत. त्यामुळे देवी देवता आणि राष्ट्रपुरुष यांच्या अवमान होतो. तरी शासनाने गणेशोत्सव निमित्ताने ‘आनंदाचा शिधा’ पिशव्यांवर श्री गणरायांचे आणि यापुढे हिंदु देवी देवता आणि राष्ट्रपुरुष यांची छायाचित्रे छापू नये या आशयाचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांना २ फेब्रुवारी आणि ३० जुलै हिंदु सेवा सहाय्य समिती आणि हिंदुत्ववादी यांच्याकडून रोजी देण्यात आले होते.
याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सव निमित्ताने देण्यात आलेल्या १ कोटी ५६ लाख आनंदाचा शिधा पिशव्यांवर देवी देवता आणि राष्ट्र पुरुष यांची छायाचित्रे छापली नाहीत. हिंदु सेवा सहाय्य समितीचा लढ्याला यश मिळाले आहे.
महाराष्ट्र शासनाने ‘आनंदाचा शिधा’ या पिशव्यांवरील हिंदू देवी देवता आणि राष्ट्रपुरुष यांची छायाचित्रे छापली नाहीत. हिंदु सेवा सहाय्य समितीचा मागणीची दखल घेऊन आनंदाचा शिधा पिशव्यांमुळे होऊ शकणारा देवी देवतांचा अवमान थांबवला.
यासाठी हिंदु सेवा सहाय्य समितीचे धर्मसेवक नरेंद्र पाटील, मोठा मारुती मंदिराचे कार्याध्यक्ष अशोक चौधरी, मारुती व्यायाम शाळेचे अर्जुन मराठे, घारू कोळी, श्री संत दगाजी महाराज मंदिर चौपाळेचे मोहन पटेल, विठ्ठल मंदिराचे अध्यक्ष रतिलाल पटेल, गणपती मंदिराचे मुख्य पुजारी प्रदीप भट, भागवताचार्य रवींद्र पाठक, बाबा गणपती मंडळाचे सुनील सोनार, पियुष सोनार, मयूर सोनार श्री दादा गणपती मंडळाचे अध्यक्ष अमोल सोनार, संत नरहरी व्यायाम शाळेचे ओम सोनार, ओम जितेंद्र सोनार, श्री भाऊ गणेश मंडळाचे अरूण सोनार, हिंदुत्ववादी घनश्याम मराठे, हिंदू सेवा सहाय्य समितीचे जितेंद्र राजपूत, पंकज डाबी, सुयोग सूर्यवंशी, जयेश भोई, विजय जोशी, उज्वल राजपूत, गणेश राजपूत आदींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजितजी पवार आणि अन्न नागरी पुरवठा मंत्री छगनजी भुजबळ यांचे पत्राद्वारे आभार मानले.