मासिक पाळीसारख्या अतिशय नाजुक व अव्यक्त विषयावर महिलांमध्ये खुलेपणाने चर्चा होणे ही काळाची गरज आहे. हीच चर्चा सखी प्रेरणा भवन माध्यमातून आज श्रीरामपूर ता.जि.नंदुरबार यासारख्या लहानशा गावातून सुरु झाली ही बाब कौतूकास्पद आहे. सखी प्रेरणा भवन म्हणजे ग्रामीण पातळीवर महिलांसाठी तयार करण्यात आलेली एक प्रतिष्ठा खोली आहे. मासिक पाळीदरम्यान महिलांना होणार्या त्रासाचे निवारण करण्यासाठी महिलांनी या सखी प्रेरणा भवनाचा नियमित वापर करावा व इतरांपुढे आदर्श घालून द्यावा, असे आवाहन जि.प.अध्यक्षा ऍड.सिमा वळवी यांनी केले.

श्रीरामपूर ग्रामपंचायत अंतर्गत गाव हगणदारीमुक्तीबाबत शाश्वतता रहावी व वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेबाबत ग्रामस्थांमध्ये जाणीव जागृती व्हावी यासाठी विविध उपक्रम सुरु आहेत. एन.एस.इ.फाउंडेशन, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने फिनिश सोसायटी या सामाजिक संस्थेच्या वतीने श्रीरामपूर येथे किशोरवयीन मुली व महिलांसाठी सखी प्रेरणा भवन हा जिल्ह्यातील पहिला प्रयोग राबविण्यात येत आहे. या सखी प्रेरणा भवनाच्या उद्घाटनाप्रसंगी जि.प.अध्यक्षा ऍड.सिमा वळवी बोलत होत्या. यावेळी जि.प.सदस्य देवमन पवार, पं.स.सदस्य कमलेश महाले, जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.वर्षा फडोळ, शिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी, सहायक गट विकास अधिकारी श्रीमती पवार, विस्तार अधिकारी भैय्यासाहेब निकुंभे, महिला व बालकल्याण विभागाच्या ज्योती पाठक, कार्यक्रम व्यवस्थापक सुनिल पाटील, सरपंच विमलबाई शत्रुघ्न गांगुर्डे, उपसरपंच शांताराम गावीत, सदस्य्य शत्रुघ्न गांगुर्डे, योगिता गायकवाड, योगेश गांगुर्डे, माजी सरपंच शकुंतला गायकवाड, ग्रामसेवक रूपाली देवरे, पोलीस पाटील विश्वास गायकवाड, उमेद अभियानाचे तालुका प्रतिनिधी, बीआरसी, सीआरसी, केंद्रप्रमुख उपस्थित होते. प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत मुलींनी पारंपारिक पोशाखात नृत्य व स्वागतगीताने केले.