Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

श्रीरामपूर येथे ‘सखी प्रेरणा भवन’ जिल्ह्यातील पहिला प्रयोग

team by team
October 12, 2021
in आरोग्य
0
श्रीरामपूर येथे ‘सखी प्रेरणा भवन’ जिल्ह्यातील पहिला प्रयोग
नंदुरबार | प्रतिनिधी

मासिक पाळीसारख्या अतिशय नाजुक व अव्यक्त विषयावर महिलांमध्ये खुलेपणाने चर्चा होणे ही काळाची गरज आहे. हीच चर्चा सखी प्रेरणा भवन माध्यमातून आज श्रीरामपूर ता.जि.नंदुरबार यासारख्या लहानशा गावातून सुरु झाली ही बाब कौतूकास्पद आहे. सखी प्रेरणा भवन म्हणजे ग्रामीण पातळीवर महिलांसाठी तयार करण्यात आलेली एक प्रतिष्ठा खोली आहे. मासिक पाळीदरम्यान महिलांना होणार्‍या त्रासाचे निवारण करण्यासाठी महिलांनी या सखी प्रेरणा भवनाचा नियमित वापर करावा व इतरांपुढे आदर्श घालून द्यावा, असे आवाहन जि.प.अध्यक्षा ऍड.सिमा वळवी यांनी केले.

श्रीरामपूर ग्रामपंचायत अंतर्गत गाव हगणदारीमुक्तीबाबत शाश्वतता रहावी व वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेबाबत ग्रामस्थांमध्ये जाणीव जागृती व्हावी यासाठी विविध उपक्रम सुरु आहेत. एन.एस.इ.फाउंडेशन, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने फिनिश सोसायटी या सामाजिक संस्थेच्या वतीने श्रीरामपूर येथे किशोरवयीन मुली व महिलांसाठी सखी प्रेरणा भवन हा जिल्ह्यातील पहिला प्रयोग राबविण्यात येत आहे. या सखी प्रेरणा भवनाच्या उद्घाटनाप्रसंगी जि.प.अध्यक्षा ऍड.सिमा वळवी बोलत होत्या. यावेळी जि.प.सदस्य देवमन पवार, पं.स.सदस्य कमलेश महाले, जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.वर्षा फडोळ, शिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी, सहायक गट विकास अधिकारी श्रीमती पवार, विस्तार अधिकारी भैय्यासाहेब निकुंभे, महिला व बालकल्याण विभागाच्या ज्योती पाठक, कार्यक्रम व्यवस्थापक सुनिल पाटील, सरपंच विमलबाई शत्रुघ्न गांगुर्डे, उपसरपंच शांताराम गावीत, सदस्य्य शत्रुघ्न गांगुर्डे, योगिता गायकवाड, योगेश गांगुर्डे, माजी सरपंच शकुंतला गायकवाड, ग्रामसेवक रूपाली देवरे, पोलीस पाटील विश्वास गायकवाड, उमेद अभियानाचे तालुका प्रतिनिधी, बीआरसी, सीआरसी, केंद्रप्रमुख उपस्थित होते. प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. मान्यवरांचे स्वागत मुलींनी पारंपारिक पोशाखात नृत्य व स्वागतगीताने केले.
यावेळी जि.प.सदस्य देवमन पवार म्हणाले की, विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात श्रीरामपूर गाव हे नेहमी अग्रेसर असते. यामुळेच गावात नाविन्यपूर्ण उपक्रम यशस्वी होतात.उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.वर्षा फडोळ यांनी सखी प्रेरणा भवन या उपक्रमाचे कौतूक केले. गावाने सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी ग्रामपंचायतीने नियोजन करून या कामासाठी जिल्हा स्तरावरुन मिळणारा निधीचा योग्य वापर करावा, गावाचा विकास करून त्यात शाश्वतता कशी टिकून राहील यावर मार्गदर्शन केले. यानंतर मंगेश निकम यांनी माझी वसुंधरा व स्वच्छतेबाबत उपस्थितांना शपथ दिली.यावेळी जि.प.शाळा श्रीरामपूर येथे फिनीश सोसायटीमार्फत उभारण्यात आलेल्या हँडवॉश स्टेशन तसेच सांडपाणी व्यवस्थापन अंतर्गत गावात तयार करण्यात आलेल्या ग्रे वॉटर ट्रीटमेंट युनीट व मुलींसाठी शौचालय व मुतारी यांची वैयक्तीक कुटूंब पातळीवर तयार करण्यात आलेले कंपोस्ट खत खड्ड्यांची पाहणी केली. यावेळी संस्थेचे अभिजीत मैदाड यांनी प्रकल्पाची माहिती दिली. गावात नव्याने सुरु करण्यात आलेल्या आरओ वॉटर फिल्टरचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. श्रीरामपूर येथे स्मशानभुमीची देखील पाहणी करण्यात आली.यावेळी गावात शाश्‍वत स्वच्छता व उघडयावरील हगणदारीमुक्ती कायम राहावी यासाठी परिश्रम घेणारे निगरानी समिती कार्यरत असून या निगरानी समितीतील सदस्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी फिनिश सोसायटीच्या प्रकल्प व्यवस्थापक आकांक्षा बोरकर, बीसीसी अधिकारी मंगेश निकम, तांत्रीक अधिकारी संतोष नागरे व सांडपाणी व्यवस्थापन तज्ञ अभिजीत मैंदाड, प्रकल्प अधिकारी निशांक गजभिये, प्रकल्प सहायक राकेश गुरव, नितीन महानुभाव, वैभव खांडवी, विजय गावित, सुनीता भोये, किशोरी ठकार, दारासिंग पावरा, निलेश पगारे, सचिन साळुंके, मारोती चिमणकर, लेखापाल अनिल गुरव  आदी उपस्थित होते. सुत्रसंचलन कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमास  जि.प.शाळा मुख्याध्यापक भिका सोनवणे, आशा,अंगणवाडी सेविका, बचत गटाच्या महिला, किशोरवयीन युवक-युवती व ग्रामस्थ उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

आयन शुगर ला गाळप परवाना प्राप्त विजयादशमीला होणार बॉयलर अग्नी प्रदीपन

Next Post

दिवाळीपुर्वी वेतन अदा करा प्रहार शिक्षक संघटनेची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add