तालुक्यातील समशेरपुर येथील आयान शुगर कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन शुभारंभ विजयादशमी अर्थात 15 नोव्हेंबरला होईल, अशी माहिती कारखान्याचे संचालक श्री.सिनगारे यांनी दिली. तसेच गाळप हंगाम चालु करणेसाठीचा आयान शुगरला साखर आयुक्त , महाराष्ट्र राज्य यांचा गाळप परवाना देखील प्राप्त झाला आहे.
श्री. सिनगारे यांनी सांगितले, आयान शुगर सालाबादाप्रमाणे गळीत हंगाम 2021- 22 साठी सज्ज आहे. दहा हजार टन गाळप क्षमता आहे. त्याचबरोबर वीज निर्मिती प्रकल्पसह पूर्ण क्षमतेने हा कारखाना सुरू होईल. दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर अग्नी प्रदीपन होईल. त्यानंतर पुढील 4-5 दिवसात प्रत्यक्ष गाळपास सुरूवात होईल. दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील भागातील संपूर्ण उसाचे गाळप करण्याचे नियोजन आहे. जास्तीत जास्त गाळप, उसाचा दर आणि वेळेत पेमेंटची विश्वासार्हता कायम राहील. परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी आपला ऊस कारखान्याकडे द्यावा, असे आवाहन श्री.सिनगारे यांनी केले आहे. कुठलाही अफवांवर विश्वास न ठेवता कारखाना वेळेवर सुरू होईल, याची ग्वाही देखील त्यांनी दिली.
परवाना प्राप्त
आयान शुगरला साखर आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांचा हंगाम 2021-22 साठी चालु करण्याचा गाळप परवाना प्राप्त झाला आहे.