Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

व्हीजेएनटी कर्मचारी पदोन्नती आरक्षणासाठी कोर्टात नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करा, भाजपचे जिल्हा प्रशासनाला निवेदन

team by team
October 12, 2021
in राजकीय
0
व्हीजेएनटी कर्मचारी पदोन्नती आरक्षणासाठी कोर्टात नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करा, भाजपचे जिल्हा प्रशासनाला निवेदन

नंदुरबार l प्रतिनिधी-

भटके विमुक्त जाती-जमातीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती मधील आरक्षणाबद्दल राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेले प्रतिज्ञापत्र तात्काळ मागे घेऊन पुन्हा नव्याने प्रतिज्ञापत्र सादर करावे अशी मागणी भाजपने केली आहे. याबाबत अपर जिल्हाधिकारी महेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात समाजावर आरक्षण देणे असंवैधानिक असल्याचे म्हटल्यामुळे भटक्या विमुक्त समाजामध्ये संतापाची लाट उसळलेली आहे.

भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मंगळवारी निवेदन दिले. जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी निवेदनात म्हटले की, 29 सप्टेंबर रोजी राज्य शासनाच्या वतीने सरकारी वकील नितीन पाटील यांनी भटके विमुक्त जाती जमातीच्या शासकीय कर्मचारि व    अधिकाऱ्यांच्या पदोन्नती मधील आरक्षणाबद्दल सर्वोच्च न्यायालयातवप्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. या प्रतिज्ञापत्रात भटक्या विमुक्त जातीजमातींना आरक्षण देने असंविधानिक असल्याचे म्हटल्यामुळे समाजात संतापाची लाट उसळलेली आहे.ही बाब भटक्या समाजासाठी अत्यंत अन्यायकारक व घातक आहे.
निवेदनावर भाजप जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, संघटन सरचिटणीस निलेश माळी,भटके-विमुक्त आघाडी जिल्हाध्यक्ष संजय साठे, जिल्हा सरचिटणीस चंद्रकांत भोई,युवा आघाडी जिल्हाध्यक्ष गजानन निकवाडे, जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद औचारे,तालुकाध्यक्ष प्रेम चव्हाण, माजी जिल्हाध्यक्ष डॉ. पावबा मोरे, जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील गोसावी, धनराळे, मनोज पवार, एकनाथ चव्हाण, गजेंद्र गोसावी,प्रशांत गोसावी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत

भटक्यांसाठी ॲट्रॉसिटी लागू करा

भटक्या विमुक्तमधील बहुतेक जातींचे अनुसूचित जाती जमातीमध्ये समावेश व्हावा अशी अनेक वर्षांपासून मागणी आहे. अनुसूचित जाती जमाती प्रमाणेच भटक्या विमुक्ताना लोकसंख्येच्या प्रमाणात सरकारी नोकरीत आरक्षण, राजकीय आरक्षण, शैक्षणिक आरक्षण तसेच पोटासाठी भटकंती करणाऱ्या या समाजासाठी अक्ट्रोसिटी कायदा लागू करावा. असे निवेदनात म्हटले आहे.

अन्यथा सरकारला धडा शिकवू

अर्थसंकल्पात लोकसंखेच्या प्रमाणात निधीची तरतूद करण्याची मागणी अनेक वर्षांपासून भटक्या विमुक्त समाजाची आहे.परंतु, यावर कोणतीही कार्यवाही न करता सध्या मिळत असलेले तुटपुंजे आरक्षण रद्द करण्याच्या आघाडी सरकारचा डाव दिसून येत आहे. हा डाव संपूर्ण समाजाच्या लक्षात आला आहे. 20 टक्के असलेला हा भटका समाज महाविकास आघाडीसह सरकारमध्ये सहभागी असलेल्या इतर दोन राजकीय पक्षाला  धडा शिकवल्या शिवाय स्वस्थ बसणार नाही. न्यायालयात सादर केलेले प्रतिज्ञापत्र तात्काळ मागे घेऊन भटक्यांचे आरक्षण पूर्ववत सुरू ठेवण्यासाठी नव्याने प्रतिज्ञापत्र दाखल करावे. अन्यथा याविरोधात भाजपतर्फे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा भाजप जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी निवेदनातून दिला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

नंदुरबार शहरात रावण दहनाचा कार्यक्रम मागील वर्षी प्रमाणे यंदाही रद्द

Next Post

आयन शुगर ला गाळप परवाना प्राप्त विजयादशमीला होणार बॉयलर अग्नी प्रदीपन

Next Post
आयन शुगर ला गाळप परवाना प्राप्त विजयादशमीला होणार बॉयलर अग्नी प्रदीपन

आयन शुगर ला गाळप परवाना प्राप्त विजयादशमीला होणार बॉयलर अग्नी प्रदीपन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

विरचक प्रकल्पात पाण्याची पातळी घटली; शहरात 10 मे पासून दोन दिवसाआड पाणीपुरवठा

May 6, 2026
नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

नाशिक कुंभमेळा निधीच्या किमान 10 टक्के निधी प्रकाशा सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी द्यावा

May 6, 2026
पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा ‘ऐतिहासिक’ विजय; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जल्लोष

May 6, 2026
संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

May 6, 2026
के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

के.डी.गावित सैनिकी विद्यालयात महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026
नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

नांदरखे येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

May 2, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add