Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार ग्राहक आयोगाचा एचडीएफसी बँकेला रक्कम परत करण्याचा आदेश

team by team
September 13, 2024
in क्राईम
0
नंदुरबार ग्राहक आयोगाचा एचडीएफसी बँकेला रक्कम परत करण्याचा आदेश

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार येथील आकाश ट्रेडिंग कंपनीचे मालक आणि व्यापारी मनोज भगवानदास नानकानी यांनी नंदुरबार येथील एचडीएफसी बँक शाखेत ठेवलेली रोख अनामत रक्कम आणि पेनल्टी चार्जेस पोटी कपात केलेली रक्कम व्याजासह परत करणे बाबतचा ग्राहक आयोगाने आदेश पारित केला आहे.

या खटल्याबाबतची माहिती अशी की, नंदुरबार येथील आकाश ट्रेडिंग कंपनीचे संचालक मनोज भगवानदास नानकानी यांनी एचडीएफसी बँकेच्या नंदुरबार शाखेत कॅश क्रेडिट अकाउंट उघडले होते. 40 लाख रुपये जमा झाले.

त्यानंतर बँकेतर्फे श्री नानकानी यांना खाते उघडल्यावर तुम्ही इतर कोणत्याही बँकेतून फर्मच्या नावे व्यवहार करू नये तसेच आपले दोन्ही खाते कस्टमरच्या खात्यांना कॅश डिपॉझिट लिमिट सेट करू व त्यावर कॅश डिपॉझिट करताना कुठलेही अतिरिक्त चार्जेस लागणार नाही असे बँकेने आश्वासन दिले. त्यामुळे नानकाणी यांनी इतर बँकेतील आपले फार्मच्या खात्यावर व्यवहार केले नाहीत. परंतु बँकेने त्यांच्या खात्यावर 26 ऑगस्ट 2016 पासून कॅश डिपॉझिट चार्जेस व पेनल्टी लावण्याचे सुरू केले.

याबाबत बँकेची संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, रिलेशन मॅनेजरकडून लिमिट सेट करायचे राहून गेले. आम्ही लवकरच तुमच्या खात्याचे कॅश डिपॉझिट सेट करू असे पुन्हा आश्वासन दिले. देखील त्यांच्या खात्यावर डिपॉझिट चार्जेस व पेनल्टी सुरूच होती.

याबाबत न्याय मिळण्या करता तक्रारदार यांनी नंदुरबार येथील जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग यांच्याकडे धाव घेतली. अडवोकेट निलेश देसाई यांच्यामार्फत तक्रार दाखल होती. या कामी दाखल तक्रार, शपथपत्र, इतर कागदपत्र,युक्तिवाद या सर्वांचे सखोल अवलोकन करून अध्यक्ष डी.एम. प्रसन्ना, सदस्या श्रीमती स्मिता व्ही. भोईटे यांनी सदरची तक्रार मंजूर करून बँकेने आदेशाचे तारखेपासून पुढील 45 दिवसांच्या आत तक्रारदारांची कपात केलेली दोन्ही खात्यावरील कॅश डिपॉझिट चार्जेस व पेनल्टी रक्कम 4 लाख 35 हजार 56 रुपये यावर दि. 10 ऑगस्ट 2022 पासून संपूर्ण रक्कम देऊन होईपर्यंत नऊ टक्के व्याजदरासह परत करावे. तसेच शारीरिक व मानसिक त्रासापोटी 30 हजार रुपये आणि तक्रार अर्जाचा खर्च 10 हजार रुपये अदा करण्यात यावे असा आदेश पारित करण्यात आला आहे.

ग्राहक ग्राहक आयोगाकडे दाखल तक्रारीचा निकाल लागल्यानंतर संबंधित व्यापाऱ्यास दिलासा मिळाला असून संपूर्ण व्यापारी क्षेत्रात समाधान व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपाचे आंदोलन

Next Post

नंदुरबार येथे श्री.विद्यासरोज हॉस्पिटलच्या दुसऱ्या शाखेचा 15 सप्टेंबर रोजी शुभारंभ

Next Post
नंदुरबार येथे श्री.विद्यासरोज हॉस्पिटलच्या दुसऱ्या शाखेचा 15 सप्टेंबर रोजी शुभारंभ

नंदुरबार येथे श्री.विद्यासरोज हॉस्पिटलच्या दुसऱ्या शाखेचा 15 सप्टेंबर रोजी शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add