Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपाचे आंदोलन

team by team
September 13, 2024
in राजकीय
0
खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपाचे आंदोलन

नंदुरबार l प्रतिनिधी-
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेत केलेल्या वक्तव्याच्या निषेध करत भाजपातर्फे नंदुरबार येथे आंदोलन करण्यात आले.

 

काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांनी अमेरिकेतील एका इंटरव्यू मध्ये सांगितले की, काँग्रेसची पक्षाची भूमिका आहे की, आरक्षण रद्द झाले पाहिजे. आरक्षण आम्ही काढून टाकू. भारतातील आरक्षण संपवण्याबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करत भाजपतर्फे नंदुरबार येथील नगरपालिके जवळ काळी फीत बांधून तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.

 

परदेशात जाऊन आपल्या देशाची बदनामी करणे हा राहुल गांधींचा उद्योगच झाला आहे. एकीकडे आपले प्रधानमंत्री आपल्या भारत देशाला जागतिक पातळीवर सर्वोच्च देश बनवण्यासाठी प्रयत्न करत आहेत तर दुसरीकडे राहुल गांधी स्वतःच्याच देशाविषयी चुकीचे भाष्य करून आपल्या देशाचा आणि देशवासीयांच्या अपमान करत आहेत.

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित, आदिवासी, ओबीसी, मागासवर्गीयांना संविधानाद्वारे दिलेले आरक्षण कोणीही संपवू शकत नाही. मुळात तो हक्क कोणालाही नाही जोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत.तोपर्यंत कोणीच आरक्षण काढू शकत नाही हे स्वतः मा.मोदी यांनी आपल्या भाषणात वारंवार सांगितलेले आहे.

 

पूर्वी काँग्रेस पक्ष अनेक वर्ष देशात सत्तेत राहिला तेव्हा त्यांच्या काळात दलितांवर अनेक प्रकारचे अत्याचार झाले,अन्याय झाला.पण भारतीय जनता पार्टी हे होऊ देणार नाही.यावेळी मा.खा.डॉ.हिना गावित यांनी सांगितले.

 

 

याप्रसंगी भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी,
जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित, आमदार राजेश पाडवी, जिल्हाध्यक्ष निलेश माळी, बळीराम पाडवी, सदानंद रघुवंशी, डॉक्टर सपना अग्रवाल, मकरंद पाटील, माणिक माळी, काजल मछले, दिव्या जोशी, पद्मा परदेशी, वैशाली राठोड, भीमसिंह राजपूत, प्रशांत पाटील, नूरभाई नुरानी, नितीन पाटील गौरव वाणी, विनोद जैन, बुधाभाई पाटील आदींसह सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

पंचवीस वर्षात प्रत्येक व्यक्ती, घर आणि गावापर्यंत योजना पोहोचवल्या : डॉ. विजयकुमार गावित

Next Post

नंदुरबार ग्राहक आयोगाचा एचडीएफसी बँकेला रक्कम परत करण्याचा आदेश

Next Post
नंदुरबार ग्राहक आयोगाचा एचडीएफसी बँकेला रक्कम परत करण्याचा आदेश

नंदुरबार ग्राहक आयोगाचा एचडीएफसी बँकेला रक्कम परत करण्याचा आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

June 16, 2026
नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

June 16, 2026
श्रीमती क.पु. पाटील  विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

श्रीमती क.पु. पाटील विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

June 16, 2026
कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

June 16, 2026
एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

एस. ए. मिशन प्राथमिक शाळा, नंदुरबार येथे शाळा प्रवेशोत्सव व नवागतांचे जल्लोषात स्वागत

June 16, 2026
‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

‘नियतकालिक श्रमशक्ती’ आणि ‘असंघटित क्षेत्र’ राष्ट्रीय सर्वेक्षणांना सुरुवात

June 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add