Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पंचवीस वर्षात प्रत्येक व्यक्ती, घर आणि गावापर्यंत योजना पोहोचवल्या : डॉ. विजयकुमार गावित

team by team
September 13, 2024
in राजकीय
0
पंचवीस वर्षात प्रत्येक व्यक्ती, घर आणि गावापर्यंत योजना पोहोचवल्या : डॉ. विजयकुमार गावित

नंदुरबार l प्रतिनिधी-
गेल्या पंचवीस वर्षात जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्ती, घर आणि गावापर्यंत केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून वैयक्तिक आणि सामुहिक लाभाच्या योजना पोहोचवल्या आहेत. राज्यातील कुठल्याही जिल्ह्यात एवढ्या लाभाच्या योजनांची अंमलबजावणी झाली नसेल एवढ्या योजना एकट्या नंदुरबार जिल्ह्यात राबवल्या आहेत, येणाऱ्या काळातही त्यांच्या अंमलबजावणीतील सातत्य कायम राहील, अशी ग्वाही आज राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी दिली आहे.

 

ते आज शहरातील दंडपाणेश्वर मंदिर येथे आयोजित शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ अंतर्गत नंदुरबार तालुक्यातील आदिवासींच्या संयुक्त दायीत्व गटांच्या पथदर्शी दुग्ध विकास प्रकल्प अंतर्गत वाटप करण्यात आलेल्या गायींच्या लाभार्थ्यांच्या आढावा बैठक, खरेदीपूर्व प्रशिक्षण व शेळी गट वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी (नंदुरबार) चंद्रकांत पवार यांच्यासह अंमलबजावणी यंत्रणांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

 

यावेळी मंत्री गावित म्हणाले, जिल्ह्याच्या निर्मितीपासून आजतागायत शासनाच्या ज्या योजना जिल्ह्यातील जनतेच्या हिताच्या आहेत त्या राबविण्यासाठी शासन दरबारी आग्रही राहिलो आहे. अपवादात्मक एखादा पात्र लाभार्थ्यी वगळता मागेल त्याला योजनेचा लाभ दिला आहे. गरजेप्रमाणे योजना हे सुत्र लक्षात घेवून मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यात योजनांची आखणी आणि अंमलबजावणी केली गेली आहे.

 

येथील माणूस, माती आणि शेतीच्या विकासासाठी शाश्वत उपाययोजना करण्यावर भर दिला आहे. आज येथे महिला बचत गटांना शेळी पुरवठा केला जाणार आहे. आदिवासी समुदायातील लोक हे प्रामुख्याने दुर्गम भागात राहत असल्याने त्यांच्याकडील जमीन उंचसखल, डोंगराळ हलक्या प्रतीची खडकाळ स्वरूपाची असते, त्या जमीनीत येणारे उत्पन्नाचे प्रमाण कमी असते,

 

योग्य प्रमाणात पाऊस न झाल्यास त्यांच्या उत्पन्नावर त्याचा मोठा परिणाम होतो. परिणामी त्यांना रोजगाराच्या शोधात कुंटूंबासह स्थलांतर करावे लागते. सदर योजनेअंतर्गत शेतीस पुरक व्यवसाय म्हणून पशुपालन व्यवसायासाठी दहा शेळ्या व एक बोकड पुरविल्यास शेतकऱ्यांच्या कुटूंबास आर्थिक फायदा होईल व त्यांचे होणारे स्थलांतराचे प्रमाण काही अंशी कमी होऊन त्यांचे जीवनमान उंचावेल हा योजनेचा मुख्य उद्देश आहे.

 

न्‍युक्लिअस बजेट अंतर्गत व शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ अंबलबजावणी यंत्रणा तसेच सूमूल डेअरी (सूरत,गुजरात) यांच्या सहकार्यातुन नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींच्या संयुक्त दायीत्व गटाकरिता प्रती लाभार्थी २ दुधाळ गायींची योजना राबविण्यात येत असून योजने अंतर्गत जिल्ह्यातील नंदुरबार तालुका ५०००, नवापूर तालुका २०००, अक्कलकुवा तालुका १५००, धडगाव १५००, शाहदा १५०० व तळोदा ५०० तीलक्यातील लाभार्थी या प्रमाणे एकूण १२००० लाभार्थी व २४००० गायींचे वितरण केले जाणार आहे. आजच्या मेळाव्यामध्ये प्रामुख्याने ज्या लाभार्थीचे गायी वाटप पूर्ण झाले आहे अश्या लाभार्थीचे महाराष्ट्र शासन कडून प्रती लीटर ५ रुपये प्रमाणे देय असलेले दुधाचे अनुदान अर्ज भरून घेणे व कागदपत्रांची पूर्तता, तसेच नव्याने गायी खरेदी साठी जाणाऱ्या लाभार्थीचे गायी खरेदी पूर्व प्रशिक्षण – पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद नंदुरबार यांचे कडून घेण्यात येणार असल्याचेही मंत्री डॉ. गावित यांनी यावेळी सांगितले.

 

 

यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांनीही मार्गदर्शन केले. तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार यांनी केले.

 

बातमी शेअर करा
Previous Post

मांजरे येथील माजी सरपंचांसह शेकडो ग्रामस्थांच्या शिंदे शिवसेनेत प्रवेश

Next Post

खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपाचे आंदोलन

Next Post
खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपाचे आंदोलन

खासदार राहुल गांधी यांच्या विरोधात भाजपाचे आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

शहादा पोलिसांची धडक कारवाई; ९० लाखांचा विदेशी मद्यसाठा व कंटेनर जप्त, दोघांना अटक

June 23, 2026
आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

आंतरराज्यीय दुचाकी चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश; ७.५० लाखांच्या २१ दुचाकी जप्त

June 23, 2026
वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

वयोश्री योजनेंतर्गत 1 हजार 4 ज्येष्ठ नागरिकांना सहाय्यक उपकरणांचे वाटप

June 16, 2026
नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

नांदरखे येथे प्रवेशोत्सव उत्साहात

June 16, 2026
श्रीमती क.पु. पाटील  विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

श्रीमती क.पु. पाटील विद्यालयात, शाळा प्रवेश उत्सव उत्साहात

June 16, 2026
कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

कोळदा येथे माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत

June 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add