नंदुरबार l प्रतिनिधी-
तळोदा तालुक्यात बिबट्यांच्या बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी सामाजिक संघटना आक्रमक झाल्या असून तळोदा येथील वन विभागाच्या कार्यालयावर सामाजिक संघटनांचा मोर्चा काढण्यात आला.महिनाभरात बिबट्याच्या हल्ल्यात एकट्या तळोदा तालुक्यात चौघांचा मृत्यू झाला आहे.
नंदुरबार जिल्ह्यात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून तळोदा तालुक्यात बिबट्यांचा वावर वाढला आहे.महिनाभरात तळोदा तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यांमध्ये चौघांचा मृत्यू झाला आहे.जिल्ह्यातील बिबट्यांचा बंदोबस्त करण्यात यावा त्यासोबत वनविभागाने योग्य त्या उपाययोजना करून बिबट्यांना मूळ अधिवासात परत पाठवण्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार करावा तसेच बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या परिवारांना लगेच आर्थिक मदत उपलब्ध करून द्यावी.
या मागणीसाठी तळोदा येथे सामाजिक संघटनांनी वन विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता वन विभागाच्या वतीने बिबट्यांच्या बंदोबस्ता संदर्भात योग्य उपायोजना न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सामाजिक संघटनांनी दिला आहे.