नंदुरबार l प्रतिनिधी
उकाई धरणाचे महाराष्ट्रासाठी राखीव असलेलं 5 टक्के टीएमसी पाणी गुजरातच्या धर्तीवर नंदुरबार तालुक्यातील गावांना मिळावे अशी मागणी निवेदन भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बुधाभाई पाटील यांनी नंदुरबार मध्यम प्रकल्पाचे उपकार्यकारी अभियंता श्री. पावरा यांना दिले.
या निवेदनात म्हटले आहे की,अनेक वर्षापासून गुजरात राज्यातील उकई धरणात ५ टक्के पाणी नंदुरबारसाठी राखीव आहे. म्हणून उकई धरणातील राखीव पाण्यातुन नंदुरबार तालुक्यातील तापी परीसरातील व्याहुर, धूळवद, शेजवा, करंजे, पिंपळोद, करणखेडा, सुंदरदे, नळवे बु, नळवे खु, बद्रीझिरा, राजापुर, गुजरभवाली, जांभोली, करजकुपे, लोणखेडा, आडछी, धमडाई व पथराई या गावांना गुजरातच्या धर्तीवर धुळवद गाव शिवाराला पाणी मिळत आहे.
तसेच पाणी उर्वरीत सर्व वरच्या गावांतील शेतक-यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी करण्यात आली. या निवेदनावर भाजपा जिल्हाध्यक्ष निलेश माळी, भाजपा किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष बुधाभाई पाटील, उपाध्यक्ष दशरथ नरोत्तम चौधरी, गणेश पुनाजी पाटील, प्रेमराज शरद पाटील, प्रशांत शांतीलाल पाटील, चूनीलाल चौधरी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.उपकार्यकारी अभियंता श्री पावरा यांनी निवेदन स्वीकारले व आश्वासन दिले.