नंदुरबार l प्रतिनिधी
एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत दिनांक 1 सप्टेंबर 2024 ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीत प्रकल्प बीट व अंगणवाडी स्तरावर राष्ट्रीय पोषण माहचे व त्यानिमित्ताने जिल्हास्तरीय कार्यशाळेचे जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांनी उद्घाटन केले.
या कार्यशाळेस परिविक्षाधिन सनदी अधिकारी पवन दत्ता, जिल्हा कार्यक्रम अधिकारी के.एफ. राठोड, सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी, सर्व विस्तार अधिकारी व अंगणवाडी पर्यवेक्षिका उपस्थित होते. मिशन सक्षम अंगणवाडी आणि पोषण 2.0 (मिशन पोषण 2.0) अंतर्गत वैयक्तिक आणि सामुदायिक स्तरावर वर्तणुकीतील बदल हा सुपोषित भारताचे अपेक्षित उद्दिष्ट साध्य करण्यासाठी एक महत्वाचा घटक आहे. या उद्देशाच्या अनुषंगाने दरवर्षी सप्टेंबर महिन्यात राष्ट्रीय पोषण माह साजरा केला जातो. या वर्षी पोषण माह 2024 साठी खालील थीम्सला अनुसरुन संवेदनाक्षम उपक्रम हाती घेण्याचे येत आहे.
*अॅनिमिया*
राष्ट्रीय पोषण माह मध्ये अॅनिमिया एक महत्वाचा विषय आहे. अॅनिमियामुळे लहान मुलांवर, गरोदर माता व किशोरवयीन मुलींच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे पोषण माह मध्ये गरोदर माता, स्तनदा माता व किशोरवयीन यांचे आरोग्य तपासणी करुन पुढील उपचार करण्यात येणार आहे.
*ग्रोथ मॉनिटरिंग*
राष्ट्रीय पोषण माह मध्ये बालकांची वजन पडताळणी, समाजिक लेखापरिक्षण व स्वस्थ व सदृढ बालक स्पर्धा यांचे आयोजन करणेत येणार आहे. तसेच निती आयोगाअंतर्गत विविध इंडिकेटर्स 100 टक्के पुर्ण करणेबाबत नियोजन करण्यात येणार आहे.
*पुरक आहार*
राष्ट्रीय पोषण माह मध्ये 6 महिन्यापर्यंत बालकांचे निव्वळ स्तनपान, मातांचे समुपदेशन तसेच 6 महिन्यानंतर स्तनपानाबरोबरच पुरक पोषण आहार, मार्गदर्शन, आहारातील विविधता व स्थानिक आहार याचा रोजचा आहारात समावेश या विषयी पाककृती प्रदर्शन आयोजन करण्यात येणार आहे. गरोदर माता व स्तनदा मातांना रोजच्या आहारात एक वेळ जास्तीचे जेवन घेण्याविषयी कार्यक्रम व वजन वाढ संनियत्रण विषयी जागृकता निर्माण केली जाणार आहे.
*पोशन भी, पढाई भी*
पुर्व बाल्यवस्था काळजी व शिक्षण प्रदर्शन मेळावा अयोजित करण्यात येणार आहे. तसेच पुर्व शालेय प्रवेश स्वागत उत्सवाचे आयोजन केले जाणार आहे.
*उत्तम प्रशासनासाठी तंत्रज्ञानाचा वापर*
पोषण ट्रॅकर तालुकास्तरीय, प्रकल्पस्तरीय व बीटस्तरीय अंगणवाडी सेविकांचे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार आहे.
*एक पेड माँ के नाम*
या मोहिमेअंतर्गत वृक्षारोपण आणि इतर सामान्य संवेदनाक्षम उपक्रम आयोजित करण्यात येत आहे.