Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

बहिण, युवकांच्या चेहऱ्यावरचे हास्य हिच शासनाच्या योजनांच्या यशाची खरी पावती : पालकमंत्री अनिल पाटील

team by team
August 17, 2024
in राजकीय
0
बहिण, युवकांच्या चेहऱ्यावरचे हास्य हिच शासनाच्या योजनांच्या यशाची खरी पावती : पालकमंत्री अनिल पाटील

नंदुरबार l प्रतिनिधी

आज नंदुरबार शहरात आल्यानंतर शासनाचा प्रतिनिधी या नात्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना आणि मुख्यमंत्री युवा कौशल्य प्रशिक्षण योजनेच्या लाभार्थ्यांनी ज्या पद्धतीने माझे स्वागत केले, त्यामुळे मी अक्षरश: भारावून गेलो आहे. बहिणी आणि युवकांच्या चेहऱ्यावरचे हास्य हिच शासनाने राबवलेल्या या योजनांच्या यशाची खरी पावती असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आपत्ती नियंत्रण, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी केले आहे.

 

ते आज शहरातील छत्रपती शिवाजी नाट्यमंदिर येथे आयोजित मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या शुभारंभ व मुख्यमंत्री युवा कौशल्य प्रशिक्षण योजनेच्या आदेश वितरण प्रसंगी बोलत होते. यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, आमदार आमशा पाडवी, माजी खासदार डॉ. हिना गावित, रतन पाडवी अभिजित मोरे, जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार जिल्हा महिला व बालविकास अधिकारी साईनाथ वंगारी, कृष्णा राठोड (जि.प.), कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त विजय रिसे यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

यावेळी बोलताना पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा, कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबुत करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” योजनेत भगिनींच्या खात्यात 14 ऑगस्टपासून पैसे जमा व्हायला सुरूवात झाली असून जिल्ह्यातील सुमारे 2 लाख 61 हजार 997 महिला भगिनींच्या खात्यात येत्या 19 ऑगस्ट रक्षाबंधनच्या दिवशीपर्यंत जुलै व ऑगस्ट महिन्याची रक्कम एकाचवेळी जमा होणार आहे. या भगिनींना “मुख्यमंत्री अन्नपूर्णा” योजनेत वर्षाला तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत. येणाऱ्या गौरी-गणपती उत्सवानिमित्त 2 लाख 70 हजार 99 शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा वितरीत करण्यात येणार आहे.

 

मुलींच्या सक्षमीकरणासाठी सुरु केलेल्या लेक लाडकी योजनेत चालू वर्षात 1 हजार मुलींच्या बॅंक खात्यावर 5 हजार रूपयांच्या पहिल्या हप्त्याची रक्कम जमा करण्यात आली आहे. तरुणांना खाजगी तसेच शासकीय आस्थापनांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव यावा, म्हणुन सुरु केलेल्या “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण” योजनेत जिल्ह्यात 2 हजार उमेदवारांना प्रथम टप्प्यामध्ये लाभ मिळणार असुन सध्या 617 उमेदवार या योजनेंतर्गत कामावर रुजू झालेले आहेत. आज 63 लोकांना प्रातिनिधीक स्वरूपात नियुक्तीचे आदेश वाटप करण्यात आले आहे.

 

राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची/दर्शनाची संधी देण्यासाठी “मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना” सुरु करण्यात आली आहे. 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांकरिता 100 टक्के अर्थसहाय्य देणारी ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ शासनाने सुरू केली आहे. दारिद्र्य रेषेखालील दिव्यांग, दुर्बलताग्रस्त ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक अक्षमतेनुसार सहाय्यभूत साधने, उपकरणे या योजनेत खरेदी करता येणार आहेत, या सर्व योजना समाजातील सर्व घटकांसाठी असून या योजनांपासून जिल्ह्यातील एकही नागरीक वंचित राहणार नाही, असा विश्वासही यावेळी पालकमंत्री अनिल पाटील यांनी दिला.

 

 

सर्वांना स्वावलंबी आणि समृद्ध करणाऱ्या योजनांची शासनाकडून आखणी
आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित

शासन सर्वसामान्य गरीब जनता नजरेसमोर ठेवून त्यांच्या गरजेच्या योजनांची आखणी आणि अंमलबजावणी करत आहे. राज्यातील प्रत्येक सर्वसामान्य गरीब स्वावलंबी आणि समृद्ध करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. सर्व कुटुंब नजरेसमोर ठेवून योजना तयार केल्या जात आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना व यासारख्या काही योजना यापूर्वी मध्य प्रदेश आणि दक्षिणेतील राज्यांमध्ये राबवल्या गेल्या आहेत. त्यांची फलश्रृती आणि त्यातून सर्वसामान्य माणसाचे झालेले समाधान लक्षात घेवून महाराष्ट्र शासनानेही आता अशा प्रकारच्या योजना हाती घेतल्या आहेत. या सर्व योजना अतिशय विचारपूर्वक सुरू करण्यात आल्या आहेत. कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून तरूणांमध्ये प्रशिक्षण आणि रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. आदिवासी विकास विभागाने ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना गाईंचे वितरणाची योजना सुरू केली, ती योजना आता सर्वांसाठी पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यभर राबवली जाणार आहे. सर्व सामान्य जनतेच्या डोक्यावर असलेले वीजबिल, रोजगार, पाणी यासारख्या प्रश्नांवर शासनाने प्राथमिकता दिली असून शहरे आणि गावे या सर्वांना बारमाही पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे, असे यावेळी बोलताना आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले.

 

 

सर्वसामान्य जनतेच्या गणिताच्या या योजनांच्या अंमलबजवणीतील गतीमानता बघून त्याचा अपप्रचार केला जातो आहे, अशा अपप्रचार करणाऱ्यांपासून सावध राहून या योजनेचा लाभ सर्वांनी घेणे हेच या अपप्रचाराचे खरे उत्तर असेल. जिल्ह्यातील दळणवळण अधिक सुलभ व्हावे यासाठी 704 कोटी रूपए खर्चाच्या रस्ते, संरक्षक भितं व लहान पूलांच्या एकूण 902 कामांना मंजूरी प्रदान करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे 300 वाड्यावस्त्या रस्त्यांनी जोडल्या जाणार आहेत. यात 300 किलोमीटर रस्ते व 30 लहान, मोठ्या पुलांचा समावेश आहे, असेही यावेळी बोलताना आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी सांगितले.

 

 

शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांसाठी प्राथमिकता-धनंजय गोगटे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना, मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना या सर्व राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजना आहेत, या सर्व योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्राथमिकता ठेवली आहे, या योजनांची जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आपल्या प्रास्ताविकातून जिल्हाधिकारी धनंजय गोगटे यांनी केले आहे.

 

सहा लाडक्या बहीणींना दिला प्रातिनिधीक लाभ
यावेळी मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेतील 06 लाभार्थी महिला भगिनींना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेश वितरीत करण्यात आले, तसेच त्यांनी यावेळी आपल्या बोली भाषेतून मनोगतही व्यक्त केले. त्यात सावित्री सुभाष पाडवी, नंदिता उखाजी वसावे, अरुणा शरद राठोड, पूनम कृष्णा बागुल, उषा सुदाम भिल, अनिता आत्माराम गावित यांचा समावेश होता.

 

21 आस्थापनांवर 63 युवकांना दिल्या नियुक्त्या
आज झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री युवा कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेत जिल्ह्यातील 21 शासकीय आस्थापनांमधील 63 पदांवर युवकांना प्रशिक्षणार्थी म्हणून प्रातिनिधीक स्वरूपात नियुक्ती आदेश वितरीत करण्यात आले.

 

राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रसारण
या कार्यक्रमानंतर पुण्यातील श्री. शिवछत्रपती क्रीडा संकुल, बॅडमिंटन हॉल, बालेवाडी येथून मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या शुभारंभाच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण उपस्थित अतिथी व लाभार्थी तसेच नागरिक यांच्यासाठी प्रसारीत करण्यात आले.

बातमी शेअर करा
Previous Post

गौरी- गणपती निमित्त देणार “आनंदाचा शिधा” : जिल्हाधिकारी धनंजय गोगटे

Next Post

भालेर, नगाव येथे ध्वजारोहण उत्साहात

Next Post
भालेर, नगाव येथे ध्वजारोहण उत्साहात

भालेर, नगाव येथे ध्वजारोहण उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026
विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

विधी सेवा महाशिबिरातून नागरिकांच्या जीवनमानात बदल घडविण्याचा प्रयत्न : न्यायमूर्ती किशोर संत

March 10, 2026
डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

डॉ. हिना गावित यांच्या हस्ते महिलांना भेट वस्तूंच वितरण

March 10, 2026
माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

माजी खा.डॉ. हिना गावित यांनी सिंहस्थ पर्वणी संदर्भात अधिकाऱ्यांकडून घेतला आढावा

March 10, 2026
भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

भाजपातर्फे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

March 7, 2026
डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

डॉ.विक्रांत बाबा मित्र परिवारा मार्फत शिवजयंती उत्साहात साजरी

March 7, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add