Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नवापूर व विसरवाडी येथे कडकडीत पाळण्यात आला बंद

team by team
October 12, 2021
in राजकीय
0
नवापूर व विसरवाडी येथे कडकडीत पाळण्यात आला  बंद

नवापूर l प्रतिनिधी-
महाविकास आघाडी व घटक पक्षांनी पुकारलेला महाराष्ट्र बंद बाबचे निवेदन नवापूर तहसिलदार मंदार कुलकर्णी यांना दिले. दरम्यान महाविकास आघाडी व घटक पक्षांनी पुकारलेला महाराष्ट्र बंदला पाठींबा देत  नवापूर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला.


यावेळी महाविकास आघाडीचे सर्व पदधिकारी व शेतकरी उपस्थित होते त्यांनी निवेदना मध्ये म्हटले आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये सत्तेमध्ये असलेल्या महाविकास आघाडीतील कॉंग्रेस पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व राज्यातील विविध शेतकरी संघटनांच्या वतीने महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आलेले आहे. या बंदा मध्ये नवापूर तालुक्यातील महाविकास आघाडी व घटक पक्ष व शेतकरी संघटना व सत्यशोधक कम्युनिष्ट संघटना यांनी सहभाग घेवून नवापूर बंद चे आवाहन केलेले आहे.केंद्रामध्ये सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या शासनाने शेतकरी विरोधी आणलेल्या ३ काळया कायद्यांच्या विरोधामध्ये शेतकरी दिल्लीच्या सिमेवरगेल्या अनेक महीन्यांपासून आंदोलन करीत आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून उत्तर प्रदेश मधील लखीमपुर खेरी येथे शेतकर्‍यांच्या आंदोलनावर भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय गृहराज्यमंत्र्याचा मुलाने शेतकर्‍यांच्या आंदोलनावर बेभानपणे कार चालवून शेतकर्‍यांना चिरडले असून त्यात अनेक शेतकरी मृत्युमुखी पडलेले आहे या परीस्थीतीची दखल सर्व पक्षांनी घेतलेली आहे. आणि पुन्हा शेतकर्‍यांच्या हक्कांच्या समर्थनार्थ सर्व पक्ष संसदीय मार्गाने लढा देण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. लोकशाही मार्गाने सुरु केलेल्या आंदोलनाला दडपण्याचा प्रयत्न केंद्रातील भा. ज. पा. सरकार सातत्याने करीत आहे. त्याचा निषेध म्हणून भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, शिवसेना प्रदेश प्रमुख, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्यातील सर्व शेतकरी संघटना यांच्या आवाहनानुसार शांततेत आंदोलन करीत आहोत.शेतकर्‍यांवर बेभानपणे गाडी चालवून त्यांच्या मृत्युस कारणीभूत ठरलेल्या व्यक्तींवर तातडीने कारवाई करावी तसेच केंद्र सरकारने शेतकर्‍यांच्या विरोधात पारीत केलेले काळे कायदे त्वरीत रद्द करावे.असे निवेदना मध्ये म्हटले आहे निवेदनावर कॉग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष जालमसिंग गावीत,शिवसेना उपजिल्हा प्रमुख हंसमुख पाटील,राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष सुरेश कोकणी,शहर अध्यक्ष शरद पाटील,इद्रीस टिनवाला,माजी नगराध्यक्ष दामू बिर्‍हाडे,माजी उपनगराध्यक्ष सोहेल बलेसरीया,आर सी गावीत,आर टी गावीत,अनिल वारुडे,प्रविन ब्रम्हे,मनोज बोरसे सह शेतकरी यांचा सह्या आहेत.
विसरवाडी येथे कडकडीत बंद
महाराष्ट्र राज्याचे महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनी उत्तर प्रदेश येथील शेतकरी हत्येच्या घटनेच्या निषेधार्थ पुकारलेल्या बंदला नवापुर तालुक्यातील विसरवाडी येथे कडकडीत बंद पाळण्यात आला आहे..विसरवाडी ग्रामपंचायत सरपंच बकाराम गावित यांनी महाराष्ट्र बंद पाठींबा दर्शवित विसरवाडी बंदची हाक देत तसेच महाविकास आघाडी घटक पक्ष कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी पक्षातर्ङ्गे कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. विसरवाडीतील भाजीपाला व्यवसायांसह सर्व व्यापार्‍यांनी दुकाने बंद ठेवून बंदमध्ये सहभाग नोंदवला असला तरी अत्यावश्यक सेवेतील रुग्णालये, मेडिकल, दुग्ध व्यवसाय, शाळा- महाविद्यालय , राज्य परिवहन महामंडळाच्या प्रवासी बस, रिक्षा प्रवासी वाहतूक पूर्णपणे सुरू आहे.विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील, पोलीस उपनिरीक्षक भूषण बैसाणे व पोलीस अंमलदार यांनी बंद दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

रोटरी क्लब ऑफ नंदुरबार आणि व्ही. एस. जी. जी. एम. यांच्या संयुक्त विद्यमाने ब्रेस्ट कॅन्सर व गर्भाशय कॅन्सर तपासणी शिबिर

Next Post

वावडी प्राथमिक आरोग्य केंद्रात नवीन अत्याधुनिक रुग्णवाहीचे जि.प सदस्य अजित नाईक यांच्या हस्ते लोकार्पण

Next Post
वावडी प्राथमिक आरोग्य केंद्रात  नवीन अत्याधुनिक रुग्णवाहीचे  जि.प सदस्य अजित नाईक यांच्या हस्ते लोकार्पण

वावडी प्राथमिक आरोग्य केंद्रात नवीन अत्याधुनिक रुग्णवाहीचे जि.प सदस्य अजित नाईक यांच्या हस्ते लोकार्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

आ. डॉ. विजयकुमार गावित यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी डॉ.हिना गावित यांची शनिदेवाला साकडे

March 19, 2026
तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

तब्बल तीन महिन्यांनी नंदुरबार जिल्ह्याला मिळाले पालकमंत्री, हसन मुश्रीफ यांची नियुक्ती

March 19, 2026
नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

नवजात मुलीला रुग्णालयातच सोडून आई फरार; पोलिसांकडून शोधमोहीम तीव्र

March 19, 2026
आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add