Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथे प्रहार संघटनेतर्फे जोडे मारो आंदोलन

team by team
October 12, 2021
in राजकीय
0
नंदुरबार येथे प्रहार संघटनेतर्फे जोडे मारो आंदोलन

नंदुरबार l प्रतिनिधी

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांची तत्काळ हकालपट्टी करा या  मागणीसाठी प्रहार शेतकरी संघटनेतर्फे प्रतिकात्मक पुतळ्यास जोडे मारो आंदोलन करण्यात आले मात्र पोलिसांनी तात्काळ कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर प्रहार संघटनेतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, लखीमपूर खेरी येथे केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या बेताल वक्तव्याचा निषेध करण्यासाठी लखीमपूर येथील शेतकरी बांधव रस्त्यावर काळे झेंडे घेऊन निषेध करीत असताना केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा याने शेतकर्‍यांवर रोष व्यक्त करत आपल्या ताब्यातील स्वतःच्या मालकीच्या गाड्यांनी चार ते पाच शेतकर्‍यांना चिरडून टाकून अमानुषतेचा कळस गाठला असून आशिष मिश्राला जरी उत्तर प्रदेश पोलीसांनी पाच दिवसानंतर अटक केली असली तरी जोपर्यंत त्यांचे वडील केंद्रीय गृहराज्य मंत्री या पदावर कार्यरत आहेत, तोपर्यंत संबंधित घटनेची चौकशी निपक्षपाती होऊन शहीद झालेल्या शेतकरी कुटुंबियांना न्याय मिळणे दुरापास्त आहे. लखीमपूर घटनेचा आम्ही तीव्र निषेध करत असून केंद्रीय गृहराज्य मंत्री अजय मिश्रा यांची त्वरीत हकालपट्टी करुन शेतकर्‍यांच्या भावना समजून घ्या. अन्यथा केंद्र सरकार व भारतीय जनता पार्टीच्या विरोधात अजून देशातील शेतकर्‍यांसह प्रहार शेतकरी संघटना एकजुटीने आदोलन तीव्र करेल असा इशारा देखील देण्यात आला आहे. या निवेदनावर प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पाटील उपाध्यक्ष रवींद्र वळवी तालुकाध्यक्ष योगेश पाटील प्रताप पाटील जिल्हा ज्येष्ठ कार्यकर्ते कृष्णदास पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

बातमी शेअर करा
Previous Post

शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त धडगांव तालुक्यात संसारोपयोगी वस्तुंचे वाटप

Next Post

नंदुरबार वगळता जिल्ह्यात कडकडीत बंद, जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

August 20, 2026
जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन

जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन

August 20, 2026
भाजपाच्या उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुख पदी हिंदू सेवक केतन रघुवंशी यांची निवड

भाजपाच्या उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुख पदी हिंदू सेवक केतन रघुवंशी यांची निवड

August 20, 2026
महा-साधना सप्ताहात नंदुरबार जिल्हा माहिती कार्यालयाचा दबदबा

महा-साधना सप्ताहात नंदुरबार जिल्हा माहिती कार्यालयाचा दबदबा

August 20, 2026
तळोदा बायपास रस्त्यावरील मंजूर महामार्गालगत सर्विस रोड सुरू करावा:  आ.चंद्रकांत रघुवंशी

तळोदा बायपास रस्त्यावरील मंजूर महामार्गालगत सर्विस रोड सुरू करावा: आ.चंद्रकांत रघुवंशी

August 16, 2026
भालेर येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

भालेर येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

August 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add