नंदुरबार l प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जनविश्वास सप्ताह सुरु असून त्या अनुषंगाने आज नंदुरबार शहरात मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नंदुरबार शहरातील मच्छीबाजार चौक येथे करण्यात आले होते.
सदर शिबिरात फिजिशियन, बालरोग तज्ज्ञ, स्त्री रोग तज्ज्ञ असे डॉक्टर टीम द्वारे संबंधित अडचणी चि तपसणी होती तसेच मधुमेह, रक्तदाब यांची तपसणी होती व त्यानुसार औषध पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नंदुरबार शहर तर्फे मोफत देण्यात येणार आहे.
सदर शिबिराचे उदघाट्न राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांच्या हस्ते करण्यात आले.त्यावेळी उपस्थित राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष माधव भाई चौधरी, राष्ट्रवादी नंदुरबार शहर अध्यक्ष मोहन माळी राष्ट्रवादी नंदुरबार तालुकाध्यक्ष मोंटू जैन, नगर सेवक फारुक मेमन, नगर सेवक इम्रान शेख गुलाम रसूल, माजी नगर सेवक हारून हलवाई, रवींद्र जावरे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर कार्याध्यक्ष कमलेश चौधरी, शहर उपाध्यक्ष् रामकृष्ण मोरे, शहर सरचिटणीस रियाज सय्यद, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष सय्यद मुजाहीद,शहर उपाध्यस राजा ठाकरे,सय्यद बाबा तणवीर, मजहर खान, सिकंदर कुरेशी,आजीम सय्यद, गुलाम नबी, अफजल खान, मंजूर खान, वसीम हलवाई आदी उपस्थित होते.