Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यात लसीकरणाने ओलांडला 9 लाख 72 हजाराचा टप्पा

team by team
October 11, 2021
in आरोग्य
0
नंदुरबार l प्रतिनिधी-
आगामी सण, उत्सवाची पार्श्वभूमी लक्षात घेता संसर्ग वाढू नये तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेचा प्रादूर्भाव टाळण्याबरोबरच कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला गती देण्यासाठी 14 ऑक्टोबरपर्यंत आरोग्य विभागाच्यावतीने जिल्ह्यात ‘मिशन कवच कुंडल’ अभियान राबविण्यात येत असून या मोहिमेत नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने जवळच्या लसीकरण केंद्रावर जाऊन लसीकरण करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती मनीषा खत्री यांनी केले आहे.जिल्ह्यात लसीकरणाने 9 लाख 72 हजाराचा टप्पा  ओलांडला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत 6 लाख 66 हजार 725 नागरीकांनी पहिला डोस तर 3 लाख 5 हजार 579 नागरीकांनी दुसरा डोस घेतलेला आहे. अद्याप ज्या नागरीकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतलेला नसेल त्यांनी तातडीने पहिला डोस घ्यावा. तसेच ज्या नागरीकांना पहिला डोस घेऊन पुरेसा कालावधी झाला असेल त्यांनी दुसरा डोस घ्यावा. यामुळे कोविड विषाणूच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी होण्यास मदत होईल. तरी नागरिकांनी कोरोना मार्गदर्शक सुचनांचे पालन करून लसीकरण करून करावे.
जिल्ह्यात लसीकरणाने ओलांडला 9 लाख 72 हजाराचा टप्पा
जिल्ह्यातील 14 लाख 93 हजार 720 लोकांना कोरोना लसीकरणाचे उद्दीष्ट होते. त्यापैकी 6 लाख 66 हजार 725 नागरिकांनी (44.64 टक्के) लसीचा पहिला डोस घेतला आहे, तर 3 लाख 5 हजार 579 नागरिकांनी (20.46) दोन्ही डोस घेतले आहेत. जिल्ह्यात 18 ते 44  वयोगटातील 2 लाख 83 हजार 484 व्यक्तींनी पहिला डोस तर 1 लाख 26 हजार 252 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. 45 वर्षावरील 3 लाख 19 हजार 478 व्यक्तींनी पहिला तर 1 लाख 57 हजार 875 व्यक्तींनी दुसरा डोस घेतला आहे. तसेच 15 हजार 784 आरोग्य कर्मचाऱ्यांनी पहिला तर 9 हजार 88 कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. 41 हजार 383 फ्रंटलाईन वर्कर्सनी पहिला तर 12 हजार 264 कर्मचाऱ्यांनी दूसरा डोस घेतला आहे. 4 हजार 582 गरोदर मातांनी पहिला तर 33 गरोदर मातांनी दूसरा डोस घेतला आहे. तर 2 हजार 14 दिव्यांगांनी पहिला डोस तर 67 दिव्यांगांनी दुसरा डोस घेतला आहे.
जिल्ह्यात 16 जानेवारी 2021 रोजी पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या हस्ते जिल्हा रुग्णालय येथे लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. जिल्ह्याने 22 एप्रिल रोजी लसीकरणाचा एक लाखाचा तर 12 मे रोजी दोन लाखाचा टप्पा पूर्ण केला. 8 जून रोजी तीन लाखाचा, 1 जुलै रोजी चार लाख, 3 ऑगस्ट रोजी पाच लाख, 28 ऑगस्ट रोजी 6 लाख, 7 सप्टेंबर रोजी 7 लाख, 20 सप्टेंबर रोजी 8 लाख तर 30 सप्टेंबर रोजी 9 लाखाचा टप्पा पूर्ण केला आहे.
एकूण उद्दीष्टाच्या 44.64 टक्के लाभार्थ्यांनी पहिला तर 20.46 टक्के लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेतला आहे. दुसरा डोस घेण्यासाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील लसीकरण मोहिमेलादेखील अधिक गती देण्यात येत असून नागरिकांनी ‘मिशन कवच कुंडल’ अभियान मोहिमेअंतर्गत लसीकरण करुन घेण्याचे आवाहन पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांनी केले आहे.
जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या लसीचा तालुकानिहाय साठा
जिल्ह्यात तालुकास्तरावर कोविशिल्ड लसीचा उपलब्ध साठा पुढीलप्रमाणे नंदुरबार 10,230 डोस, नवापूर 11,710 डोस, शहादा 11,420 डोस, तळोदा 5,600 डोस, धडगाव 12,210 डोस, अक्कलकुवा 12,580 डोस, जिल्हा रुग्णालय 170 डोस, जिल्हा लस भांडार 21,600 डोस असे एकूण 85,520 डोस शिल्लक आहेत तर कोव्हक्सिन लसीचे नंदुरबार 1,680 डोस, नवापूर 5330 डोस, शहादा 450 डोस, तळोदा  640 डोस, धडगाव 10 डोस, अक्कलकुवा  निरंक डोस, जिल्हा रुग्णालय  230 डोस, जिल्हा लस भांडार  9,410 डोस असे एकुण 17,750 डोस शिल्लक आहेत.
बातमी शेअर करा
Previous Post

लळींग घाटात ट्रकला पिकअप वाहन धडकल्याने आसाने येथील युवक ठार तर दोनजण जखमी

Next Post

नंदुरबार येथे तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या वतीने निदर्शने,13 ऑक्टोबर पासून काम बंद आंदोलनाचा दिला इशारा

Next Post
नंदुरबार येथे तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या वतीने निदर्शने,13 ऑक्टोबर पासून काम बंद आंदोलनाचा दिला इशारा

नंदुरबार येथे तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या वतीने निदर्शने,13 ऑक्टोबर पासून काम बंद आंदोलनाचा दिला इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

August 20, 2026
जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन

जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन

August 20, 2026
भाजपाच्या उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुख पदी हिंदू सेवक केतन रघुवंशी यांची निवड

भाजपाच्या उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुख पदी हिंदू सेवक केतन रघुवंशी यांची निवड

August 20, 2026
महा-साधना सप्ताहात नंदुरबार जिल्हा माहिती कार्यालयाचा दबदबा

महा-साधना सप्ताहात नंदुरबार जिल्हा माहिती कार्यालयाचा दबदबा

August 20, 2026
तळोदा बायपास रस्त्यावरील मंजूर महामार्गालगत सर्विस रोड सुरू करावा:  आ.चंद्रकांत रघुवंशी

तळोदा बायपास रस्त्यावरील मंजूर महामार्गालगत सर्विस रोड सुरू करावा: आ.चंद्रकांत रघुवंशी

August 16, 2026
भालेर येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

भालेर येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

August 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add