Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

नंदुरबार येथे तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या वतीने निदर्शने,13 ऑक्टोबर पासून काम बंद आंदोलनाचा दिला इशारा

team by team
October 11, 2021
in राज्य
0
नंदुरबार येथे तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या वतीने निदर्शने,13 ऑक्टोबर पासून काम बंद आंदोलनाचा दिला इशारा
नंदुरबार l प्रतिनिधी-
महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर डुबल यांना ई भूमी अभिलेखचे रामदास जगताप यांनी अपशब्द वापरून अर्वाच्च भाषेत अपमान केल्याने नंदुरबार येथे तलाठी संघाने निदर्शने केली.असंविधानिक भाषा वापरणाऱ्या  रामदास जगताप यांच्या विरोधात कारवाई न केल्यास दि.13 ऑक्टोबर पासून तलाठी संघाने काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.
महाराष्ट्र राज्य तलाठी संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर डुबल यांना व्हॉटसअप वरून रामदास जगताप ई भुमी अभिलेख प्रकल्प राज्य समन्वयक यांनी अपशब्द व अर्वाच्च भाषेचा शब्दप्रयोग करून अपमान केल्याने अशी असंविधानिक भाषा वापरणाऱ्या अधिकाऱ्यावर वरिष्ठांनी तत्काळ कारवाई करावी यासाठी नंदुरबार तलाठी संघाच्या वतीने तहसील कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन सादर करण्यात आले. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रामदास जगताप यांच्यावर कारवाई न केल्यास दि. 13 ऑक्टोंबर पासून तलाठी संघाच्यावतीने आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. यात निवडणूक व नैसर्गिक आपत्तीचे काम वगळता इतर कामांवर बहिष्कार टाकून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा नंदुरबार तलाठी संघाचे अध्यक्ष राॅबिन गावित यांनी दिला आहे. त्याचबरोबर तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांचे वेतन वेळेवर मिळत नसून ते महिन्याच्या 5 तारखेपर्यंत नियमित करावे, वेतनातून कमी केलेला भत्ता पूर्ववत करावा, कार्यालयीन खर्चाच्या निधीतून टेबल-खुर्ची व इतर फर्निचर देण्यात यावे, अतिरिक्त पदभार असलेल्या तलाठी व मंडळ अधिकार्‍यांना शासनाच्या नियमानुसार वेतन देण्यात यावे. अशा मागण्यांचे निवेदन देखील यावेळी सादर करण्यात आले. या समस्यांचे वेळेत निराकरण न झाल्यास तलाठी संघातर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.यावेळी विविध पदाधिकारी उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यात लसीकरणाने ओलांडला 9 लाख 72 हजाराचा टप्पा

Next Post

एस.ए.मिशन हायस्कूल येथे आंतरराष्ट्रीय बालिका दिवस साजरा

Next Post
एस.ए.मिशन हायस्कूल येथे आंतरराष्ट्रीय बालिका दिवस साजरा

एस.ए.मिशन हायस्कूल येथे आंतरराष्ट्रीय बालिका दिवस साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

हवालदार भटू धनगर यांना निष्कलंक सेवेबद्दल भारत सरकारचे राष्ट्रीय सेवा पदक

August 20, 2026
जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन

जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त प्रेस फोटोग्राफर संघटनेतर्फे कॅमेरा पूजन

August 20, 2026
भाजपाच्या उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुख पदी हिंदू सेवक केतन रघुवंशी यांची निवड

भाजपाच्या उत्तर महाराष्ट्र सहसंपर्कप्रमुख पदी हिंदू सेवक केतन रघुवंशी यांची निवड

August 20, 2026
महा-साधना सप्ताहात नंदुरबार जिल्हा माहिती कार्यालयाचा दबदबा

महा-साधना सप्ताहात नंदुरबार जिल्हा माहिती कार्यालयाचा दबदबा

August 20, 2026
तळोदा बायपास रस्त्यावरील मंजूर महामार्गालगत सर्विस रोड सुरू करावा:  आ.चंद्रकांत रघुवंशी

तळोदा बायपास रस्त्यावरील मंजूर महामार्गालगत सर्विस रोड सुरू करावा: आ.चंद्रकांत रघुवंशी

August 16, 2026
भालेर येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

भालेर येथे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

August 16, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add