नंदुरबार l प्रतिनिधी
मारोतराव वारंगे यांची हत्या करणाऱ्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा मिळावी या मागणीचे निवेदन अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थेतर्फे देण्यात आले.
अखिल भारतीय भोई समाज सेवा व समस्त भोई समाज बांधव यांच्यामार्फत निवासी उपजिल्हाधिकारी निलेश भामरे देण्यात आलेल्या निवेदनचा आशय असा नांदेड जिल्ह्यातील पेवा ता. हदगांव येथील मच्छिमार भोई समाज बांधव स्व. मारोतराव वारंगे यांच्या डोक्यात लोखंडी रॉड घालुन त्यांना जबर दुखापत त्यांच्या गावातील जाधव कुटुंबातील तीन सदस्यांनी दि ९ जुलै रोजी सकाळी ८ वा वारंगे यांच्या मुला व मुली समक्ष केली होती. ते दि. १४ तारखेला जखमी वारंगे यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली व ते मृत्यूमुखी पडले. वारंगे यांच्यावर हल्ल्यामागे जातीवादी राजकारणाचा भाग असल्याचे पुढे येत असून मराठा विरुध्द ओबीसी या सध्या महाराष्ट्रात चालु असलेल्या वादाची पार्श्वभूमी या मागे असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली आहे. हल्ल्याच्या वेळी भोया तु जास्त राजकारण करतो का ? थांब तुझा माज जिरवतो असे म्हणत हल्ला केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी यांनी दिली असून जातीवादी राजकारणाचाच हा बळी असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
आम्ही सर्व महाराष्ट्रातील तमाम भोई समाज बांधव ह्या निवेदना मार्फत अर्ज करीतो की, भोई समाजाला देखील अॅट्रॉसिटी सारख्या कायद्याचे संरक्षण मिळणे गरजेचे झाले आहे. भोई समाज एक अल्पसंख्य समाज असुन बहुसंख्य जातीतील उच्चवर्णिय समाज हा नेहमीच आमच्या समाजावर अन्याय करीत आला आहे.
तसेच वरील गुन्ह्यातील आरोपी यांच्यावर कठोर कलमे दाखल करुन त्यांना सर्वांना फाशीची शिक्षा करुन यापुढे कोणीही अशी हिंमत करणार नाही अशी पावले उचचले जाणे गरजेचे झाले आहे.
जाती वादाचे विष आता तळागाळात पोहचते आहे. सदर घटनेमुळे राज्यातील संपूर्ण भोई समाजामध्ये संतापाची लाट पसरली असून त्या अनुषंगाने खालील प्रमाणे मागण्या आम्ही आपणाकडे सादर करीत आहोत.
सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी. सर्व घटनेची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी.
सदरचा खटला जलदगती न्यायालयात चालविण्यात यावा.सदर खटल्यासाठी जेष्ठ विधीज्ञांची सरकार तर्फे नियुक्ती करण्यात यावी.आरोपींना फाशीची किंवा कठोर शिक्षा देण्यात यावी.भोई समाजाला अॅट्रॉसिटी कायद्याचे संरक्षण कवच मिळावे.पिडीत कुटुंबाचे सरकारतर्फे पुनर्वसन करण्यात यावे. यासह विविध मागण्या निवेदनात केले आहेत.
निवेदनावर अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुपडू शंकर खेडकर, राष्ट्रीय सहसचिव रामदास मोरे, राष्ट्रीय सदस्य जयंतीलाल खेडकर, रामकृष्ण मोरे,तुकाराम लांबोळे,अशोक शिवदे , प्रकाश वानखेडे,राजु तावडे, राजेंद्र जाधव,डॉ. गणेश ढोले यांच्या सह्या आहेत.